भुसावळरेल्वे

भुसावळमार्गे दिवाळीसाठी उधना-झंझारपूर, उधना-मधुबनी विशेष गाड्या

जळगाव लाईव्ह न्यूज । दिवाळी आणि छठपूजेच्या पार्श्वभूमीवर गावी जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने अतिरिक्त अनारक्षित विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. उधना ते झंझारपूर आणि उधना ते मधुबनी या मार्गांवर विशेष गाड्या धावणार असून, या दोन्ही मार्गांवर एकूण १८ फेऱ्या होणार आहेत. या गाड्यांना भुसावळ स्थानकावर थांबा देण्यात आल्याने उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

उधना-झंझारपूर मार्गावर गाडी क्रमांक ०९०७५ ही विशेष गाडी ५, ६, ९, १०, ११ आणि १२ नोव्हेंबर रोजी उधना येथून सकाळी ११.३० वाजता रवाना होईल. ही गाडी दुसऱ्या दिवशी रात्री ११.३० वाजता झंझारपूर येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०९०७६ झंझारपूर येथून ७, ८, ११, १२, १३ आणि १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ६.३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६.४५ वाजता उधना येथे पोहोचेल.

त्याचप्रमाणे उधना-मधुबनी मार्गावर गाडी क्रमांक ०२०३५ ही विशेष गाडी ५, ९ आणि १२ नोव्हेंबर रोजी उधना येथून सकाळी ८.३५ वाजता रवाना होईल. ही गाडी दुसऱ्या दिवशी रात्री ९ वाजता मधुबनी येथे पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०९०३६ मधुबनी येथून ७, ११ आणि १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ६.४५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६.४५ वाजता उधना येथे पोहोचेल.

या दोन्ही मार्गावरील विशेष गाड्यांना चलथान, बारडोली, नंदुरबार, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी यांसह विविध प्रमुख स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. त्यामुळे भुसावळ आणि परिसरातील तसेच उत्तर भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांना या विशेष गाड्यांचा मोठा फायदा होणार आहे.

दिवाळी आणि छठपूजेच्या काळात नियमित गाड्यांमध्ये मोठी गर्दी होत असताना अतिरिक्त अनारक्षित गाड्या सुरू केल्याने प्रवाशांना पर्यायी प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button