सोने - चांदीचा भाव

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांना झटका ! जळगाव सुवर्णबाजारात सोनं-चांदीत मोठी दरवाढ

जळगाव लाईव्ह न्यूज । दिवाळीच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. सराफा बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. दिवाळीत सोने-चांदीचे दर कमी होण्याची अपेक्षा असताना उलट दर वाढल्याने ग्राहकांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. Gold Silver Rate Today

जळगावच्या सुवर्णबाजारात आज सकाळी बाजार सुरू होताच सोन्याच्या दरात प्रति तोळा ३ हजार ५०० रुपयांची वाढ झाली. तर चांदीच्या दरातही तब्बल ५ हजार रुपयांपर्यंतची वाढ नोंदवण्यात आली आहे. ऐन दिवाळीत झालेल्या या दरवाढीमुळे सोने-चांदी खरेदीचे नियोजन करणाऱ्या ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

दरवाढीनंतर जळगाव सराफ बाजारात आज २४ कॅरेट सोन्याचा विनाजीएसटी दर १० ग्रॅमसाठी १ लाख ४५ हजार रुपये इतका झाला आहे. तर जीएसटीसह सोन्याचा दर १ लाख ४९ हजार ३५० रुपये इतका आहे.

दुसरीकडे, चांदीच्या दरातही मोठी उसळी पाहायला मिळाली. आज चांदीचा विनाजीएसटी दर प्रति किलो १ लाख ९५ हजार रुपये, तर जीएसटीसह २ लाख ८५० रुपये इतका झाला आहे.

दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या पार्श्वभूमीवर सोने-चांदी खरेदीला मोठे महत्त्व असते. त्यामुळे सणाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या या दरवाढीचा ग्राहकांच्या खरेदीवर काय परिणाम होतो, याकडे आता लक्ष लागले आहे. दरम्यान, आगामी काळात सोन्या-चांदीच्या दरात आणखी चढ-उतार होण्याची शक्यता असल्याने ग्राहकांचे लक्ष सराफ बाजारातील दरांकडे लागले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button