
जळगाव लाईव्ह न्यूज । दिवाळीच्या सणात सोनं-चांदी खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी आहे. जळगावच्या सराफा बाजारात ३१ ऑक्टोबर रोजी सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ३ हजार ३०० रुपयांनी, तर चांदीचा दर प्रति किलो ८ हजार रुपयांनी कमी झाल्याची माहिती आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळू शकतो.
जळगावच्या सराफा बाजारात शुक्रवारी, ३० ऑक्टोबर रोजी १० ग्रॅम सोन्याचा भाव १ लाख ४१ हजार ३०० रुपये होता. शनिवारी त्यात ३ हजार ३०० रुपयांची घसरण होऊन सोन्याचा दर १ लाख ३८ हजार रुपयांवर आला. हे दर जीएसटीशिवाय आहेत.
सोन्यापाठोपाठ चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. शुक्रवारी एक किलो चांदीचा भाव १ लाख ९० हजार रुपये होता. शनिवारी त्यात ८ हजार रुपयांची घट होऊन चांदीचा दर १ लाख ८२ हजार रुपयांवर आल्याची माहिती आहे. हे दरही जीएसटीशिवाय आहेत.
१५ दिवसांत सोनं १० हजारांनी, चांदी ५० हजारांनी घसरल्याचा दावा
विशेष गेल्या पंधरा दिवसांत सोन्याच्या दरात सुमारे १० हजार रुपयांची, तर चांदीच्या दरात सुमारे ५० हजार रुपयांची घसरण झाल्याचे सांगितले जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी आणि गुंतवणूकदारांच्या व्यवहारांचा परिणाम मौल्यवान धातूंच्या किमतींवर होत असतो. त्यामुळे सोनं-चांदीच्या दरांत चढ-उतार पाहायला मिळत आहेत.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोनं-चांदीच्या दरात झालेल्या या घसरणीमुळे ग्राहकांना खरेदीची संधी मिळू शकते. मात्र, पुढील दिवसांत दर आणखी कमी होणार की पुन्हा वाढणार, याकडे ग्राहक आणि सराफ व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे.





