सोने - चांदीचा भाव

घसरण थांबली, सोने-चांदी पुन्हा महागले! जळगावच्या सराफ बाजारातील आजचे दर जाणून घ्या

जळगाव लाईव्ह न्यूज । दिवाळीचा सण तोंडावर आला असताना सोने आणि चांदी खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून घसरत असलेल्या सोने आणि चांदीच्या दरांनी पुन्हा एकदा उसळी घेतली आहे.

जळगावच्या सराफ बाजारात आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत वाढ नोंदवण्यात आली आहे. सोन्याच्या दरात २०० रुपयांची, तर चांदीच्या दरात एक हजार रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडण्याची शक्यता आहे.

सोन्याच्या दरात २०० रुपयांची वाढ

जळगावच्या सराफ बाजारात २ नोव्हेंबर रोजी सोन्याच्या दरात २०० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे जीएसटीसह १० ग्रॅम सोन्याचा भाव १ लाख ४२ हजार ३४६ रुपयांवर पोहोचला आहे.

चांदीही महागली

सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. जळगावच्या सराफ बाजारात चांदीच्या दरात एक हजार रुपयांची वाढ नोंदवण्यात आली असून, तिचा भाव १ लाख ८८ हजार ४९० रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे चांदीची खरेदी करणाऱ्या ग्राहकांनाही आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

हिंदू संस्कृतीमध्ये सोने आणि चांदीला विशेष महत्त्व आहे. दिवाळी, धनत्रयोदशी यांसारख्या सणांच्या काळात अनेकजण शुभमुहूर्तावर सोने-चांदी खरेदीला प्राधान्य देतात. सर्वसामान्य ग्राहकांपासून ते श्रीमंतांपर्यंत अनेकांचा मौल्यवान धातूंच्या खरेदीकडे कल असतो. मात्र, गेल्या काही दिवसांतील घसरणीनंतर आता दोन्ही धातूंचे दर पुन्हा वाढल्याने ग्राहकांसमोर खरेदीबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. आगामी काळात दर आणखी वाढणार की पुन्हा घसरण होणार, याकडे सराफ व्यावसायिकांसह ग्राहकांचे लक्ष लागले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button