
जळगाव लाईव्ह न्यूज । दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून, सणासुदीच्या काळात सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांची लगबग सुरू झाली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर अनेक कुटुंबांकडून आवर्जून सोन्याचे दागिने खरेदी केले जातात. अशातच सोन्याच्या दरात घसरण सुरूच असल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
आज आठवड्याच्या पहिल्याच सोने कोसळताना दिसत आहे. चांदीच्याही दरात आता मोठी घसरण झाली. ऐन सणासुदीच्या काळात देशभरात सोन्याच्या भावाता मोठी घसरण झाल्याने खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे.
जळगावच्या सुवर्णपेठेत आजचे सोन्याचे दर
जळगावच्या बाजारातील उपलब्ध दरांनुसार, २६ ऑक्टोबर रोजी २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १ लाख ४२ हजार ५७० रुपये, तर २२ कॅरेट सोन्याचा भाव १ लाख ३० हजार ६९० रुपये आहे. चांदीचा एक किलोचा भाव जवळपास २ लाखाच्या पासपास आहेत हे दर जीएसटी आणि इतर शुल्कांपूर्वीचे सूचक दर आहेत. दागिन्यांची अंतिम किंमत ठरवताना जीएसटी आणि घडणावळ यांचा अतिरिक्त खर्च लागू शकतो. त्यामुळे प्रत्यक्ष खरेदीपूर्वी स्थानिक सराफाकडून अंतिम दराची खात्री करणे आवश्यक आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चढ-उतार सुरू आहेत. उपलब्ध माहितीनुसार, गेल्या आठवड्यात २४ कॅरेट सोन्याच्या दरात ५ हजार ८० रुपयांची, तर २२ कॅरेट सोन्याच्या दरात ४ हजार ६५० रुपयांची घसरण नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी सोन्याचे दर आणखी कमी होण्याची प्रतीक्षा करणाऱ्या ग्राहकांचे लक्ष आता सराफा बाजाराकडे लागले आहे.
दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांना दिलासा
दिवाळीच्या काळात सोने खरेदीला विशेष महत्त्व असते. अनेक कुटुंबे या निमित्ताने अंगठी, कानातील रिंग, मंगळसूत्र, चेन यांसारखे छोटे-मोठे दागिने खरेदी करतात. सोन्याच्या वाढलेल्या किमतींमुळे काही ग्राहकांनी खरेदी पुढे ढकलली होती. मात्र, अलीकडील घसरणीमुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.





