मुक्ताईनगर

मुक्ताईनगरकरांचा प्रवास होणार सुखकर! आगारात आणखी चार एसटी बसेस दाखल होणार

जळगाव लाईव्ह न्यूज । मुक्ताईनगर बस आगारातील एसटी बसेसची उपलब्धता वाढवण्यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या मागणीला यश आले आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे दहा राजमाता जिजाऊ एसटी बसेस उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार यापूर्वी पाच बसेस मुक्ताईनगर आगारात दाखल झाल्या असून, आता आणखी चार बसेस येत्या दोन दिवसांत दाखल होणार आहेत. त्यामुळे आगाराच्या ताफ्यात वाढ होऊन प्रवाशांना एसटी सेवेचा अधिक लाभ मिळण्याची अपेक्षा आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील प्रवाशांची गैरसोय दूर व्हावी आणि बससेवा अधिक सक्षम व्हावी, या उद्देशाने आमदार चंद्रकांत पाटील यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे दहा राजमाता जिजाऊ एसटी बसेसची मागणी केली होती. या मागणीच्या अनुषंगाने पहिल्या टप्प्यात पाच बसेस आगारात उपलब्ध करून देण्यात आल्या. आता दुसऱ्या टप्प्यात आणखी चार बसेस दाखल होणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

ग्रामीण भागातील प्रवाशांना होणार फायदा

मुक्ताईनगर आगारातील बसेसची संख्या वाढल्याने ग्रामीण भागातील नागरिकांसह दररोज कामानिमित्त प्रवास करणारे प्रवासी, विद्यार्थी आणि नोकरदारांना याचा फायदा होण्याची अपेक्षा आहे. नव्या बसेसमुळे प्रवासी वाहतुकीची क्षमता वाढण्यास मदत होणार असून, एसटी सेवेवरील ताण कमी होण्यासही हातभार लागू शकतो.

मुक्ताईनगर आगारासाठी दहा बसेस उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी आतापर्यंत पाच बसेस दाखल झाल्या असून, आणखी चार बसेस येत्या दोन दिवसांत दाखल होणार आहेत. त्यामुळे उर्वरित एका बसबाबत पुढील कार्यवाहीकडे लक्ष लागले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button