नोकरी संधी

BHEL मध्ये 660 पदांसाठी भरती; 10वी/ ITI उत्तीर्ण उमेदवारांना मोठी संधी..

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी विशेष । सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) मध्ये ६६० जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख १८ नोव्हेंबर २०२६ आहे.या भरतीत फिटर, वेल्डर, टर्नर, मशीनिस्ट, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक आणि फाउंड्रीमन या ट्रेडमधील उमेदवारांना संधी मिळणार आहे. इच्छुक उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालता त्वरित अर्ज करावा.

कोणत्या ट्रेडमध्ये किती जागा?

फिटर – २७८ जागा
वेल्डर – १०४ जागा
टर्नर – ५२ जागा
मशीनिस्ट – १०१ जागा
इलेक्ट्रिशियन – ९० जागा
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक – २३ जागा
फाउंड्रीमन – १२ जागा
अशा प्रकारे एकूण ६६० पदे भरली जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता काय?

या भरतीसाठी उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित ट्रेडमध्ये किमान ६० टक्के गुणांसह ITI/NAC पात्रता आवश्यक आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी गुणांची अट ५५ टक्के आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित ट्रेडसाठी जाहिरातीत नमूद केलेल्या पात्रतेची खात्री करावी.

वयोमर्यादा आणि सवलत

१ ऑक्टोबर २०२६ रोजी उमेदवाराचे वय १८ ते २७ वर्षांच्या दरम्यान असावे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत पाच वर्षांची, तर इतर मागासवर्गीय (OBC) उमेदवारांना तीन वर्षांची सूट देण्यात आली आहे.

अर्ज शुल्क किती?

या भरतीसाठी खुल्या प्रवर्गातील (GEN), OBC आणि EWS उमेदवारांना १,०७२ रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तर SC, ST, दिव्यांग (PWD) आणि माजी सैनिक (ExSM) उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ४७२ रुपये आहे.

नोकरीचे ठिकाण कुठे?

निवड झालेल्या उमेदवारांना तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तराखंड, तेलंगणा, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश येथील BHEL च्या विविध युनिट्समध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख

या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख १८ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ११ वाजून ४५ मिनिटे अशी देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदतीपूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत भरती जाहिरात वाचून पदनिहाय पात्रता, निवड प्रक्रिया आणि इतर अटी तपासणे आवश्यक आहे.

जाहिरात (PDF)Click Here
Online अर्ज Apply Online

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button