जळगाव जिल्हा

राज नगर दुर्गोत्सव मंडळाची कार्यकारिणी जाहीर

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील निमखेडी रोड परिसरातील शिवधाम मंदिराजवळील राज नगर महिला मंडळाच्या वतीने नवरात्रोत्सवाच्या आयोजनासाठी दुर्गोत्सव मंडळाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अध्यक्षपदी सौ. जयश्री सुभाष सोनार, उपाध्यक्षपदी सौ. भारती अंकुश सूर्यवंशी, खजिनदारपदी सौ. निलिमा किरण बच्छाव, सचिवपदी सौ. उज्वला रविंद्र सोनवणे, तर सल्लागारपदी सौ. मालती मनोहर पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

राज नगर दुर्गोत्सव मंडळाच्या वतीने दरवर्षी नवरात्रोत्सव उत्साहात साजरा केला जातो. यानिमित्ताने दहा दिवस महिलांसाठी गरबा व दांडिया कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. तसेच लहान मुलांसाठी विविध मनोरंजक खेळ व उपक्रम आयोजित केले जातात. या कार्यक्रमांमुळे परिसरातील महिला, मुली आणि लहान मुलांना आपली कला सादर करण्याची संधी मिळते, तसेच सामाजिक एकोपा आणि सांस्कृतिक परंपरा जपण्यास मदत होते.

यंदाही नवरात्रोत्सव आनंदात, उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येत आहे.सामाजिक उपक्रमात महिलांचा सहभाग वाढविणे,सांस्कृतिक उपक्रमांना प्रोत्साहन देणे आणि परिसरातील नागरिकांमध्ये एकतेची भावना दृढ करणे, हा मंडळाचा उद्देश आहे.नवरात्रोत्सवास राज नगर मधील सर्व महिला भगिनी,पुरुष बांधव, लहान थोर सर्वांचे सहकार्य लाभत आहे .

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button