सोने - चांदीचा भाव

ग्राहकांना दिलासा! नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी सोने-चांदीत घसरण, जळगावातील आजचे दर पाहा!

जळगाव लाईव्ह न्यूज । नवरात्रोत्सावाला उत्साहात सुरुवात झाली असून काही दिवसांवर दसऱ्यासारखा मोठा सण येऊन ठेपला आहे. भारतीय संस्कृतीत आणि परंपरेत विजयादशमीच्या (दसऱ्याच्या) शुभमुहूर्तावर सोने-चांदी खरेदीला विशेष महत्त्व दिले जाते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किमतीत मोठ्या प्रमाणावर चढ-उतार सुरू असल्याने ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

अशातच, ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी जळगावच्या सुवर्णपेठेत सोने आणि चांदीच्या दरात घट नोंदविण्यात आली आहे. आज सकाळी बाजार उघडल्यावर सोने चांदीत प्रत्येकी एक हजाराहून अधिकची घसरण झालीय. सणासुदीच्या काळात दागिने खरेदीचा विचार करणाऱ्यांसाठी ही घसरण महत्त्वाची मानली जात आहे. मात्र, देशांतर्गत बाजारात दर कमी झाले असतानाच आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत तेजी दिसून आली.

जळगावात सोने-चांदीचा दर काय?
जळगाव सराफ बाजारात आज सकाळी बाजारपेठ उघडल्यावर सोने दरात १०३० रुपयांची घट झाल्याने सोने जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,५३,७७९ रुपयांपर्यंत खाली आले. यापूर्वी शनिवारी १०३ रुपयांची किरकोळ वाढ नोंदविण्यात आल्याने २४ कॅरेट सोन्याचे दर तीन टक्के जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,५४,८०९ रुपयांपर्यंत पोहचले होते.

तर दुसरीकडे चांदी दरात १०३० रुपयांची घट झाल्याने चांदी जीएसटीसह प्रति किलो २,३१,७५० रुपयांपर्यंत खाली आली. यापूर्वी शनिवारी १०३० रुपयांची वाढ झाल्याने चांदी तीन टक्के जीएसटीसह २,३१,७५० रुपयांपर्यंत पोहचली होती.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button