जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । आसाम रायफल्समध्ये सहभागी होऊन देशसेवा करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. आसाम रायफल्सने टेक्निकल आणि ट्रेड्समन रॅली भरती २०२६ साठी अधिसूचना जारी केली आहे. या भरतीअंतर्गत विविध तांत्रिक आणि ट्रेड्समन पदांवर उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. या भरतीमध्ये एकूण ३५३ पदे भरण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे १०वी आणि १२वी उत्तीर्ण उमेदवारांनाही या भरतीत सहभागी होता येणार आहे. Assam Rifles Bharti 2026

या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २८ सप्टेंबर २०२६ पासून सुरू होणार असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख २८ ऑक्टोबर २०२६ आहे. इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारखेची वाट न पाहता आवश्यक कागदपत्रांसह अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावा. Assam Rifles Recruitment 2026

पदांचा तपशील :
वॉरंट ऑफिसर (सायफर) – १२४
रायफलमन (इलेक्ट्रिकल फिटर सिग्नल) -३२
रायफलमन (लाइनमन फील्ड) -२१
रायफलमन (आर्मरर) -२९
रायफलमन (इंजिनिअर इक्विपमेंट मेकॅनिक) -१०
रायफलमन (रिकव्हरी व्हेईकल मेकॅनिक) -१३
रायफलमन (इलेक्ट्रिशियन मोटर व्हेईकल) -२२
हवालदार (इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक)- ६
रायफलमन (मेटलस्मिथ) -१९
रायफलमन (अपहोल्स्टर) -३
रायफलमन स्टोअर कीपर टेक्निकल -१६
रायफलमन (व्हेईकल मेकॅनिक) -२३
रायफलमन (वेल्डर) -२
वॉरंट ऑफिसर (ड्राफ्ट्समन)- २
वॉरंट ऑफिसर (ऑपरेशन थिएटर टेक्निशियन)- १
वॉरंट ऑफिसर (फिजिओथेरपिस्ट) -२
रायफलमन (मेसन) -२९
शैक्षणिक पात्रता काय?
पदनिहाय शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. बहुतांश रायफलमन पदांसाठी १०वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमधील ITI किंवा तांत्रिक प्रशिक्षण आवश्यक आहे. काही पदांसाठी संबंधित डिप्लोमा किंवा तांत्रिक पात्रता मागण्यात आली आहे.
वॉरंट ऑफिसर (सायफर) पदासाठी १२वीमध्ये भौतिकशास्त्र, गणित आणि इंग्रजी विषयांसह ITI किंवा संबंधित पदवीची आवश्यकता आहे. ड्राफ्ट्समन पदासाठी १२वी उत्तीर्ण तसेच आर्किटेक्चरल असिस्टंटशिप डिप्लोमा आवश्यक आहे.
ऑपरेशन थिएटर टेक्निशियन आणि फिजिओथेरपिस्ट पदांसाठी १२वीसोबत संबंधित डिप्लोमा आणि निर्धारित अनुभवाची अट आहे. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी आपल्या पदाची शैक्षणिक पात्रता तपासणे आवश्यक आहे.
वयाची अट
१ जुलै २०२६ रोजी उमेदवाराचे वय पदानुसार निश्चित केले जाईल.
वॉरंट ऑफिसर (सायफर, ड्राफ्ट्समन, ऑपरेशन थिएटर टेक्निशियन, फिजिओथेरपिस्ट) : १८ ते २५ वर्षे
इतर संबंधित पदे : १८ ते २३ वर्षे
SC/ST उमेदवारांना ५ वर्षे, तर OBC उमेदवारांना ३ वर्षांची वयोमर्यादा शिथिलता मिळेल.
अर्ज शुल्क
सामान्य आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी १०० रुपये अर्ज शुल्क आहे. तर SC, ST, माजी सैनिक आणि महिला उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट देण्यात आली आहे.
संपूर्ण भारतात नोकरीची संधी
या भरतीत निवड झालेल्या उमेदवारांचे नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे. भरती मेळावा २३ नोव्हेंबर २०२६ पासून सुरू होणार आहे.
अर्ज कसा करायचा?
इच्छुक उमेदवारांना केवळ आसाम रायफल्सच्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. अर्ज प्रक्रिया २८ सप्टेंबरपासून सुरू होईल आणि २८ ऑक्टोबर २०२६ रोजी बंद होईल. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचून आपली पात्रता तपासावी.











