गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर DYSP नितीन गणपुरे यांचे दुचाकीवरून पेट्रोलिंग

सप्टेंबर 21, 2026 10:51 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरात गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली असून, हा उत्सव पूर्णपणे शांततापूर्ण आणि सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी जळगाव शहर पोलिसांनी कंबर कसली आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात असून, पोलीस यंत्रणा पूर्णपणे सतर्क असल्याचे दिसून येत आहे.

dysp ganapure

याच पार्श्वभूमीवर DYSP नितीन गणपुरे यांनी स्वतः दुचाकीवरून शहरातील विविध भागांत फिरत पेट्रोलिंग (गस्ती) केली. पोलीस प्रशासनाचा हा ग्राउंड लेव्हलवरील सहभाग आणि सक्रियता नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करणारी ठरत आहे. या गस्तीदरम्यान त्यांच्यासोबत त्यांचे अंगरक्षक अवेश शेख, सचिन साळुंखे, अमोल ठाकूर आणि प्रणय पवार हेदेखील उपस्थित होते.

संवेदनशील परिसरावर बारीक नजर
गणेशोत्सवादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी संबंधित पोलीस ठाण्यांचे गोपनीय पोलीस अधिकारी आणि कर्मचारी पूर्णपणे सक्रिय झाले आहेत. शहरामधील प्रमुख गणेश मंडळे, गर्दीची ठिकाणे तसेच संवेदनशील परिसरांवर पोलिसांकडून बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

जळगाव शहर पोलिसांच्या या दणदणीत बंदोबस्तामुळे व सततच्या गस्तीमुळे गणेशोत्सव यंदा अत्यंत शांततेत, निर्विघ्नपणे आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडेल, असा विश्वास नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now