विविध शैक्षणिक संस्थांमध्ये भक्तिमय वातावरणात लाडक्या बाप्पाची स्थापना
जळगाव लाईव्ह न्यूज । ध्वनीप्रदुषण रोखण्यासाठी गोदावरी फाउंडेशन संचलित विविध शैक्षणिक संस्थांतर्फे यंदा डीजे मुक्त गणेशोत्सव असा संकल्प करण्यात आला आहे. त्यानुसार गोदावरी हेल्थ सिटीसह विविध शैक्षणिक संस्थांमध्ये भक्तीमय वातावरणात आराध्य देवता गणरायाची विधीवत स्थापना करण्यात आली. यावेळी बाप्पाच्या जयजयकाराने महाविद्यालयासह शैक्षणिक संस्थांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला.

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन महाविद्यालया
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन येथे श्री गणेशोत्सवाचे औचित्य साधून ’गोदावरी कॅम्पसचा राजा’ भव्य आगमन सोहळा व श्रींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना अत्यंत उत्साहात पार पडली. डॉ. प्रशांत वारके आणि डॉ. निलीमा वारके यांच्या हस्ते श्री गणेशमूर्तीची विधीवत पूजा-अर्चा व प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी ढोलताशांच्या गजरात विद्यार्थ्यांनी बाप्पाचे स्वागत केले.

डॉ. उल्हास पाटील इंग्लीश मीडियम स्कूल भुसावळ
डॉ. उल्हास पाटील इंग्लीश मीडियम स्कूल भुसावळ येथे ी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात गणरायाचे आगमन झाले.पारंपरिक वाद्यांच्या गजरात तसेच उत्साहपूर्ण वातावरणात गणरायाची मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या आणि पारंपरिक वाद्यांच्या निनादात गणरायाचे महाविद्यालय परिसरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. माजी खा डॉ उल्हास पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजा-अर्चा करून गणरायाची स्थापना केली.यावेळी प्रिन्सिपल अनघा पाटील, सर्व विद्यार्थी, शिक्षक तसेच नॉन-टीचिंग स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय,
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात पारंपरिक वाद्यांच्या गजरात व भक्तिमय वातावरणात श्री गणरायाची विधिवत स्थापना करण्यात आली.यावेळी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेश तायडे, डॉ. ज्ञानेश्वर सिंग, प्रा. सुशील चव्हान शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. मंत्रोच्चार, आरती आणि गणरायाच्या जयघोषात गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय,
श्री गणरायाची विधिवत स्थापना करण्यात आली.यावेळी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील आणि सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. गणपती मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा व पूजा प्रा. निलेश वाणी यांनी सपत्नीक केली. गणेशोत्सवाच्या काळात विविध सांस्कृतिक, शैक्षणिक, तसेच शाडू मातीचा गणपती व रांगोळी स्पर्धा या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी विद्यार्थी समिती नेमण्यात आली आहे. त्यामध्ये पावबा पाटील, ध्रुव पाटील, देवेश पाटील, सुमित ठिगळे, अमोलिक जंजाळे, रोहन पाचपांडे, साक्षी खडके, अनुष्का बर्हाटे, सानिका कारंडे, गुंजन महाजन, तेजल वराडे, कविता सोनोने, प्रीती बोरोले, लीना व काजल पाटील त्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. प्रा. नकुल गाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी समिती कार्य करीत आहे.
डॉ. उल्हास पाटील विधी विज्ञान व डॉ वर्षा पाटील फॅशन महाविद्यालय
गोदावरी फाउंडेशन संचालित डॉ. उल्हास पाटील विधी विज्ञान व डॉ वर्षा पाटील फॅशन महाविद्यालय येथे भक्तिमय वातावरणात गणरायाचे आगमन झाले. प्राचार्य डॉ झोपे, फॅशनच्या प्राचार्य कविता देशमुख यांच्या उपस्थितीत विधिवत पूजा करून गणरायाची स्थापना केली. यावेळी सर्व विद्यार्थी, शिक्षक तसेच नॉन-टीचिंग स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गोदावरी आयएमआर महाविद्यालय
गोदावरी आयएमआर महाविद्यालयात गणेशोत्सवानिमित्त ’गोदावरी कॅम्पसचा राजा’ भव्य आगमन सोहळा व गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा उत्साहात पार पडला. संस्थेचे संचालक डॉ. प्रशांत वारके आणि डॉ. निलीमा वारके यांच्या हस्ते श्रींच्या मूर्तीची विधीवत पूजा-अर्चा करून प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.ते श्रींच्या मूर्तीची विधीवत पूजा-अर्चा करून प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. या गणेशोत्सवानिमित्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अत्यंत आकर्षक आणि नयनरम्य अशी सजावट (डेकोरेशन) साकारली आहे. तसेच, सामाजिक बांधिलकी जपत गोदावरी फाउंडेशन व गोदावरी आयएमआर प्रस्तुत ’रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईट’च्या (रोटरी क्लब ऑफ जळगाव एलाईट) वतीने “सहयोग निधी प्रकल्प” राबवण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत श्री गणेश मूर्ती विक्रीतून मिळणारा निधी अनाथ मुलांच्या मदतीसाठी आणि कल्याणासाठी वापरला जाणार आहे. विद्यार्थ्यांचा हा उपक्रम आणि कलात्मक सजावट कॅम्पसमध्ये कौतुकाचा विषय ठरत आहे.या सोहळ्याला महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








