जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । तुम्हीही पदवी पास असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत विविध सुरक्षा दलांमध्ये १८७१ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामध्ये दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक तसेच केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील (CAPF) उपनिरीक्षक पदांचा समावेश आहे.

अर्ज प्रक्रिया १० सप्टेंबरपासून सुरु झाली आहे. इच्छुक उमेदवार आयोगाच्या अधिकृत वेबसाइट ssc.gov.in द्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक ३० सप्टेंबर पर्यंत आहे त्यापूर्वी इच्छुकांनी अर्ज करावा.

या भरतीमध्ये दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (Exe.) पुरुष पदाच्या 205 जागा, उपनिरीक्षक (Exe.) महिला पदाच्या 112 जागा, CAPF मधील उपनिरीक्षक (GD) पदाच्या 1320 जागा आणि CAPF मधील उपनिरीक्षक (Fire) पुरुष पदाच्या 234 जागा आहेत.
कोणत्या पदासाठी किती जागा?
दिल्ली पोलीस उपनिरीक्षक (Exe.) – पुरुष : 205 जागा
दिल्ली पोलीस उपनिरीक्षक (Exe.) – महिला : 112 जागा
CAPF उपनिरीक्षक (GD) : 1320 जागा
CAPF उपनिरीक्षक (Fire) – पुरुष : 234 जागा
शैक्षणिक पात्रता
दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (Exe.) पुरुष पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी तसेच हलके वाहन चालक परवाना (LMV) आवश्यक आहे. महिला उपनिरीक्षक आणि CAPF उपनिरीक्षक (GD) पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे.
CAPF मधील उपनिरीक्षक (Fire) पदासाठी B.Sc. मध्ये Physics, Chemistry आणि Mathematics विषयांसह पदवी किंवा 10वी उत्तीर्ण आणि संबंधित अभियांत्रिकी शाखेतील डिप्लोमा आवश्यक आहे. यामध्ये मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, ऑटोमोबाईल्स, केमिकल, मायनिंग, एरोनॉटिकल किंवा टेलिकम्युनिकेशन या शाखांचा समावेश आहे.
वयोमर्यादा
1 ऑगस्ट 2026 रोजी पद क्र. 1 ते 3 साठी उमेदवारांचे वय 20 ते 25 वर्षे असावे. तर CAPF उपनिरीक्षक (Fire) पदासाठी वयोमर्यादा 18 ते 30 वर्षे आहे.आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सवलत देण्यात येणार आहे. SC/ST उमेदवारांना 5 वर्षे, तर OBC उमेदवारांना 3 वर्षांची वयोमर्यादा सवलत मिळणार आहे.
अर्ज शुल्क
या भरतीसाठी GEN/OBC उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. तर SC/ST आणि माजी सैनिक (ExSM) उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट देण्यात आली आहे.
वेतनश्रेणी :
दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक – Rs.35,400/- ते Rs.1,12,400/-
CAPF मधील उपनिरीक्षक (GD) – 35,400/- ते Rs.1,12,400/-
CAPF मधील उपनिरीक्षक (Fire) – Rs.35,400/- ते Rs.1,12,400/-
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या पदवीधर उमेदवारांसाठी ही महत्त्वाची संधी असून, अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी पदनिहाय शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि इतर आवश्यक अटी तपासणे आवश्यक आहे.











