५ अत्याधुनिक मशिन्स गरजू रुग्णांच्या सेवेत समर्पित
जळगाव लाईव्ह न्यूज । रोटरी क्लब ऑफ जळगाव नॉर्थच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात महत्त्वपूर्ण पाऊल उचलत ’ग्लोबल ग्रँड प्रोजेक्ट’ अंतर्गत महादेव हॉस्पिटल, आकाशवाणी चौक, जळगाव येथे ’जळगाव नॉर्थ रोटरी हेमोडायलिसिस सेंटर’चा भव्य शुभारंभ अत्यंत उत्साहात पार पडला.

या प्रकल्पांतर्गत रुग्णालयात ५ अत्याधुनिक हेमोडायलिसिस मशिन्स बसविण्यात आल्या असून यामुळे गरजू किडनी विकाराच्या रुग्णांना दर्जेदार व अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध होणार आहे. आंतरराष्ट्रीय सहकार्यातून आकारास आला प्रकल्प — आरोग्यसेवेचा विस्तार करण्याच्या उद्देशाने साकारलेल्या या ग्लोबल ग्रँड प्रोजेक्टचे होस्ट स्पॉन्सर ’रोटरी क्लब ऑफ जळगाव नॉर्थ’ (आर आय डीस्ट्रीक्ट३०३०) आणि इंटरनॅशनल स्पॉन्सर ’रोटरी क्लब ऑफ सिंगापूर’ (आर आय डीस्ट्रीक्ट३०३० ३३१०) हे आहेत.


तसेच या संपूर्ण उपक्रमाला ’द रोटरी फाउंडेशन ऑफ रोटरी इंटरनॅशनल’चे विशेष सहकार्य लाभले आहे.दिग्गजांची प्रमुख उपस्थितीया कार्यक्रमास आयपीडीजी ज्ञानेश्वर शेवाळे आणि आरआयडी ३०३० चे जिल्हा गव्हर्नर (२०२६-२७) रोटेरियन डॉ. राजेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या सोबतच डॉ. उल्हास पाटील, रोटेरियन राजेंद्र भामरे आणि डॉ. वैभव पाटील हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. उपस्थितांनी रोटरी क्लबच्या या सामाजिक आणि आरोग्यदायी उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.
नियोजन व विशेष योगदानसदर कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन रो. चंदन कोल्हे आणि रो. डॉ. शौनक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.प्रकल्प यशस्वी करण्यासाठी क्लबचे अध्यक्ष रो. उमेश पाटील, सचिव रो. रुपेश सरोदे, प्रोजेक्ट सचिव रो. प्रशांत अग्रवाल, तसेच रो. बिपिन पाटील, रो. हितेंद्र धांडे आणि रो. भरत कर्डिले यांनी विशेष परिश्रम व योगदान दिले.जळगाव व परिसरातील गरजू रुग्णांना अत्यंत सुलभ व नियमित हेमोडायलिसिसची सुविधा मिळणार असल्याने हा प्रकल्प खान्देशातील आरोग्यसेवेच्या दृष्टीने एक मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास याप्रसंगी व्यक्त करण्यात आला.






