जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील ई-सेक्टरमध्ये असलेल्या श्री आनंद बॅटरी कंपनीत चोरी करणाऱ्या सहा जणांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून चोरीला गेलेल्या शिशाच्या धातूच्या १६ विटा तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण १ लाख २७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

काय होती घटना?
दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ९ ते १ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्री १२ वाजेच्या दरम्यान एमआयडीसीच्या ई-सेक्टरमधील श्री आनंद बॅटरी कंपनीत ही चोरी झाली होती. फिर्यादी लखन वासुदेव बुधानी (रा. कंवर नगर, जळगाव) यांच्या मालकीच्या या कंपनीत अज्ञात चोरट्यांनी कंपाऊंडची जाळी तोडून प्रवेश केला आणि १ लाख २५ हजार रुपये किमतीच्या, ५०० किलो वजनाच्या शिशाच्या धातूच्या २० नग विटा लांबवल्या होत्या. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ९ ते १ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्री १२ वाजेच्या दरम्यान एमआयडीसीच्या ई-सेक्टरमधील श्री आनंद बॅटरी कंपनीत ही चोरी झाली होती. फिर्यादी लखन वासुदेव बुधानी (रा. कंवर नगर, जळगाव) यांच्या मालकीच्या या कंपनीत अज्ञात चोरट्यांनी कंपाऊंडची जाळी तोडून कंपनीत प्रवेश केला. त्यानंतर १ लाख २५ हजार रुपये किमतीच्या शिशाच्या धातूच्या २० विटा, वजन सुमारे ५०० किलो, चोरून नेल्या.
या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना गुन्ह्याचा सखोल तपास करून आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या.
त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले. पथकाने घटनास्थळाची पाहणी करून महत्त्वाचे पुरावे संकलित केले. तसेच सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा माग काढण्यात आला.
तपासादरम्यान पोलिसांनी आसिफ शहा सिकंदर शहा (रा. फुकटपुरा, तांबापुरा, जळगाव), मोहसीन शाह सिकंदर शाह (रा. फुकटपुरा, तांबापुरा, जळगाव), महेश उर्फ बापु संतोष भोई (रा. तांबापुरा, जळगाव), मुकेश राजु परमार (रा. गौतम नगर, तांबापुरा, जळगाव), शेख आबिद शेख मोहम्मद (रा. फुकटपुरा, तांबापुरा, जळगाव), शकील शहा रुबाब शहा (रा. बिलाल चौक, तांबापुरा, जळगाव) या सहा जणांना ताब्यात घेण्यात आले
पोलिसांनी आरोपींची सखोल चौकशी केली असता त्यांनी कंपनीत चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्याकडून ९७ हजार ५०० रुपये किमतीच्या शिशाच्या धातूच्या १६ विटा, वजन ३९० किलो, तसेच चोरीसाठी वापरलेली सुमारे ३० हजार रुपये किमतीची हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल जप्त करण्यात आली. अशाप्रकारे पोलिसांनी एकूण १ लाख २७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली पो.उप निरी. चंद्रकांत पुंडलीक धनके, श्रेणी पो.उप निरी. विजयसिंग पाटील, पो.हे. कॉ. गिरीश दिलीप पाटील, पो.हे.कॉ. प्रमोद लाडवंजारी, पो. हे. कॉ. रामकृष्ण पाटील, पो.हे.कॉ. किरण चौधरी, पो.हे.कॉ. मोतीलाल बोरसे, पो.अं. शशिकांत मराठे, पो.अं. रमाकांत साळुंखे यांच्या पथकाने कामगिरी केली आहे.










