जळगाव लाईव्ह न्यूज । गोदावरी फाउंडेशनच्या आधारस्तंभ स्व. गोदावरी आई यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजीओथेरेपी, डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. उल्हास पाटील रूग्णालय, गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातर्फे अभिवादनपर कार्यक्रम घेण्यात आले.

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फेही स्व. गोदावरी आई पाटील यांना अभिवादन करण्यात आले. डॉ. केतकी पाटील सभागृहात झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी माजी खा. डॉ. उल्हास पाटील, हृदयविकार प्रमुख डॉ. वैभव पाटील, डीन डॉ. प्रशांत सोळंके, संचालक डॉ. एन.एस. आर्विकर, रजीस्ट्रार प्रमोद भिरूड यांच्यासह इतर महाविद्यालयांचे प्राचार्य उपस्थित होते.

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालय

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात मेट्रन कार्यालयातर्फे स्व. गोदावरी आई यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गोदावरी फाउंडेशचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, हृदयविकार विभागाचे प्रमुख डॉ. वैभव पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत, डॉ. विजय बाविस्कर, डॉ. सुभाष बडगुजर, सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. शिवाजी सादुलवाड, डॉ. युवराज बढे, प्रशासन अधिकारी आशिष भिरूड यांच्यासह डॉ. संकेत पाटील, मनिषा खरात, किर्ती पाटील व मेट्रन विभागाचे सहकारी उपस्थित होते.
डॉ.उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजीओथेरेपी महाविद्यालय
डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजीओथेरेपी महाविद्यालयात स्व. गोदावरी आई यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला गोदावरी फाउंडेशनचे चेअरमन डॉ. उल्हास पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. प्रशांत सोळंके, फिजीओथेरेपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर, डॉ. अमित जैस्वाल, प्रा. चित्रा म्रीधा, प्रशासकीय अधिकारी राहुल गिरी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते स्व. गोदावरी आईंच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. याचप्रमाणे गोदावरी अभियांंत्रिकी, गोदावरी आयएमआर, डॉ.वर्षा पाटील इन्स्टीटयुट,विधी व विज्ञान तसेच फॅशन महाविद्यालय, डॉ. उल्हास पाटील कृषि, कृषि अभियांत्रिकी, अन्न व तंत्रज्ञान, गोदावरी स्कुल, डॉ. उल्हास पाटील इग्लिश मिडीयम स्कुल भुसावळ व सावदा, डॉ.उल्हास पाटील होमीओपॅथी महाविद्यालय,डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालय आणि महादेव हॉस्पीटल जळगाव येथे देखिल अभिवादन करण्यात आले.








