ग्राहकांना झटका ! आज सोने 4300 रुपयांनी, तर चांदी 10 हजारांनी वधारली, नवीन दर पहा..

ऑगस्ट 20, 2026 12:53 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । सोने आणि चांद प्लॅन करणाऱ्या ग्राहकांना मोठा झटका देणारी बातमी आहे. आज सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठी वाढ झालीय. सोबतच चांदी दरातही मोठी उसळी दिसून आली. एकीकडे सणासुदीचे दिवस जवळ आले असताना सोने-चांदी दरात वाढ झाल्याने ग्राहकांचे बजेट कोलमडणार आहे.

gold rate 2

सोन्याचा दर

goodreturns वेबसाईट नुसार, आज गुरुवारी सकाळी बाजार उघडताच जळगावच्या सुवर्णपेठेत सोन्याचे दर तब्बल ४ हजार ३०० रुपये प्रति तोळ्याने वाढले आहेत. यानंतर २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा भाव १ लाख ५९ हजार २७० रुपये इतका झाला आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा दर १ लाख ४६ हजार रुपये आणि १८ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा भाव १ लाख १९ हजार ४६० रुपये इतका आहे.

दसरीकडे चांदी दरातही मोठी वाढ झाली आहे. चांदीचा प्रति किलोचा दर तब्बल १०,००० रुपयांनी वाढून २,५५,००० रुपयावर पोहोचला आहे.

सराफा बाजारातील दरात दिवसभरात बदल होण्याची शक्यता असून, ग्राहकांनी खरेदीपूर्वी स्थानिक सराफा बाजारातील ताजे दर तपासून घ्यावेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now