धरणगावात १४ ऑगस्टला प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन; १०वी ते पदवीधर तरुणांसाठी संधी

ऑगस्ट 13, 2026 3:03 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, धरणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, धरणगाव येथे दि. १४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे. या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये युवाशक्ती फाउंडेशन, जळगाव व लिग्रेंड प्रा. लि जळगाव असे नांमाकीत उद्योजक उपस्थित राहणार आहेत.

job

या मेळाव्यास १० वी, १२वी, ग्रॅज्युएट इत्यादी पदांसाठी मुलाखती घेण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index या महा स्वयंरोजगार व रोजगार पोर्टल या संकेतस्थळावर नाव नोंदणी केलेली असल्यास आपल्या युजर आयडी व पासवर्डद्वारे लॉग-इन करून उपलब्ध रिक्त पदांसाठी अर्ज करावेत. ज्या उमेदवारांनी अद्याप नाव नोंदणी केलेली नाही त्यांनीही सर्व शैक्षणिक कागदपत्रांसह मुलाखतीच्या दिवशी प्रत्यक्ष उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

याबाबत काही अडचण असल्यास किंवा अधिक माहितीसाठी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ या वेळेत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, जी.एस. ग्राऊंडजवळ, जळगाव येथे प्रत्यक्ष भेट द्यावी किंवा ०२५७-२९५९७९० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संदीप ज्ञा. गायकवाड, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांनी केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now