जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । बँकेत सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) क्लर्क (ज्युनियर असोसिएट्स – कस्टमर सपोर्ट सेल्स) पदांसाठी महाभरती जाहीर केली आहे. या भरतीद्वारे तब्बल ९,१२४ रिक्त जागा भरल्या जाणार आहे. ग्रॅज्युएट्स उमेदवारांना बँकेत नोकरी मिळविण्याची ही उत्तम संधी आहे. SBI Clerk Bharti 2026

या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ११ ऑगस्टपासून सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार sbi.co.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन किंवा या पेजवरून ऑनलाइन अर्ज भरू शकतात. अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट आहे आणि अर्जाची प्रिंट काढण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर २०२६ आहे.

पदाचे नाव : ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स)
शैक्षणिक पात्रता आणि वय
उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून पदवी पास असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, उमेदवारांना स्थानिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे किमान वय २० वर्षांपेक्षा कमी आणि कमाल वय २८ वर्षांपेक्षा जास्त नसावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये सवलत दिली जाईल. कृपया नोंद घ्यावी की, वयाची गणना १ एप्रिल २०२६ रोजीच्या स्थितीनुसार केली जाईल.
अर्ज शुल्क :
सर्वसाधारण/ओबीसी/ईडब्ल्यूएस: ₹७५०
एससी/एसटी/पीडब्ल्यूबीडी/एक्सएस/डीएक्सएस: कोणतेही शुल्क नाही
किती मिळेल पगार?
ज्युनियर असोसिएट पदासाठी सुरुवातीचा मूळ पगार ₹२६,७३० आहे. यामध्ये पदवीधर उमेदवारांसाठी दोन आगाऊ वेतनवाढींचा समावेश आहे. मुंबईसारख्या महानगरात, महागाई भत्ता (DA) आणि इतर भत्त्यांसह सुरुवातीचा एकूण पगार अंदाजे दरमहा ₹४६,००० असेल.
अर्ज कसा करावा?
उमेदवार एसबीआयच्या (SBI) अधिकृत वेबसाइटवरील करिअर्स (Careers) विभागाद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.
उमेदवारांनी नोंदणी करणे आणि अर्ज प्रक्रियेदरम्यान आपला तात्पुरता नोंदणी क्रमांक व पासवर्ड सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे
माहिती काळजीपूर्वक भरणे महत्त्वाचे आहे.
अंतिम सबमिशनपूर्वी माहितीमध्ये तीन वेळा बदल करता येईल.
अर्जामध्ये अलीकडील रंगीत छायाचित्र, सही, डाव्या अंगठ्याचा ठसा आणि इंग्रजीमधील हस्तलिखित घोषणापत्र अपलोड करणे आवश्यक आहे.
छायाचित्राचा आकार २० ते ५० केबी, सहीचा १० ते २० केबी, डाव्या अंगठ्याच्या ठशाचा २० ते ५० केबी आणि हस्तलिखित घोषणापत्राचा ५० ते १०० केबी दरम्यान असावा.












