रावेर येथे ११ ऑगस्टला भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन

ऑगस्ट 10, 2026 5:51 PM

डॉ केतकी पाटील फाऊंडेशन व कौशल्य रोजगार उद्योजकता यांचा उपक्रम

जळगाव लाईव्ह न्यूज । सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या माध्यमातून डॉ केतकी पाटील फौंडेशन आणि कौशल्य रोजगार उद्योजकता, मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक ११ ऑगस्ट रोजी रावेर येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात शेकडो युवकांना रोजगार देण्यात येणार असल्याचा मानस आहे.

rojgar fair jpg webp

गोदावरी फाऊंडेशन च्या संचालिका तथा भारतीय जनता पक्ष जळगाव जिल्हा पूर्वच्या जिल्हा सरचिटणीस डॉ केतकी ताई पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून युवकांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा ११ ऑगस्ट रोजी सरदार जी जी हायस्कुल येथील जिमखाना हॉल येथे सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे.

यात लिग्रँड प्रा. ली. जळगाव, अस्टीमो प्रा ली बांभोरी, रेमंड प्रा ली जळगाव, सुप्रीम इंडस्ट्रीज जळगाव, इ गिअर प्रा ली पुणे, क्वेस कॉर्प ली पुणे (टाटा मोटर्स पुणे), पद्मालय फार्मा प्रोड्युसर कंपनी चोपडा यांच्यासह पुण्यातील नामांकित कंपन्या सहभागी झाल्या आहेत.या मेळाव्याचा लाभ दहावी पास ते पदवीधर शिक्षण प्राप्त युवकांना घेता येणार आहे. हा मेळावा सरदार जी जी हायस्कुल यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला आहे. तरी रावेर शहरासह तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now