सामान्यांच्या न्यायहक्कासाठी पुढाकार; ‘न्याय विश्वास फाउंडेशन’च्या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

ऑगस्ट 10, 2026 12:04 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । प्रत्येक नागरिकाला योग्य कायदेशीर मार्गदर्शन सहज उपलब्ध व्हावे आणि सर्वसामान्यांच्या मनात न्यायव्यवस्थेबाबत विश्वास निर्माण व्हावा, या उद्देशाने अ‍ॅडव्होकेट अनिकेत उज्ज्वल निकम संचालित ‘न्याय विश्वास फाउंडेशन’ यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते

nyay foundation

पिंप्राळा येथील ठाकूर समाज मंगल कार्यालयात ९ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत हे शिबिर पार पडले. फाउंडेशनचे हे दुसरे शिबिर असून, पिंप्राळा व खोटेनगर परिसरासह जळगाव शहर व जिल्ह्यातील नागरिकांनी 400 पेक्षा अधिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध कायदेशीर समस्यांबाबत तज्ज्ञ वकिलांकडून मार्गदर्शन घेतले.

दैनंदिन जीवनात जमिनीचे वाद, मालमत्तेचे प्रश्न, ७/१२ उतारे, पती-पत्नी व कौटुंबिक वाद, पोलीस तक्रारी, एफआयआर, न्यायालयीन प्रक्रिया तसेच विविध कायदेशीर कागदपत्रांबाबत नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. योग्य कायदेशीर माहितीच्या अभावामुळे अनेकदा नागरिकांचे आर्थिक व मानसिक नुकसान होते. ही बाब लक्षात घेऊन न्याय विश्वास फाउंडेशनच्या माध्यमातून नागरिकांना तज्ज्ञांकडून थेट आणि मोफत मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आले.

‘न्यायव्यवस्थेबाबत विश्वास निर्माण करणे हा उद्देश’

शिबिराच्या प्रारंभी अ‍ॅडव्होकेट अनिकेत निकम यांनी प्रास्ताविकातून उपक्रमामागील भूमिका स्पष्ट केली. लोकांच्या मनात न्यायव्यवस्थेबाबत विश्वास आणि कायद्याबाबत जागृती निर्माण करणे, हा न्याय विश्वास फाउंडेशनच्या स्थापनेमागील प्रमुख उद्देश आहे.यासाठी फाउंडेशनच्या माध्यमातून पुढील काळात जळगाव शहरातील प्रत्येक प्रभागात मोफत कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच, सहा महिन्यांनंतर जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातही अशी शिबिरे घेण्यात येणार असून, विविध समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविण्यात येतील, असे ॲड. अनिकेत निकम यांनी सांगितले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now