चाळीसगाव लैंगिक अत्याचार प्रकरण; आरोपीला 20 वर्षांचा सश्रम कारावास

ऑगस्ट 2, 2026 10:29 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । चाळीसगाव येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपीला 20 वर्षांच्या सश्रम कारावासाची तसेच ₹1.10 लाख दंडाची शिक्षा सुनावली आहे.

court crime jpg webp

मिळालेल्या माहितीनुसार, आकाश ऊर्फ सुश्रुत पांडुरंग पाटील (रा. चाळीसगाव) याने सन 2023 मध्ये अल्पवयीन मुलीला फूस लावून तिच्यावर अत्याचार केला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

या प्रकरणाची सुनावणी चाळीसगाव येथील विशेष (POCSO) न्यायालयात झाली. सुनावणीनंतर न्यायालयाने आरोपी दोषी असल्याचे ठरवत 20 वर्षांचा सश्रम कारावास, ₹1,10,000 दंड, तसेच दंड न भरल्यास 9 महिन्यांच्या अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली.

याशिवाय, बाल लैंगिक अत्याचार संरक्षण (POCSO) कायद्यानुसार पीडित अल्पवयीन मुलीला ₹5 लाखांची नुकसानभरपाई देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. या खटल्यात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अनुराधा वाणी यांनी प्रभावीपणे कामकाज पाहिले. न्यायालयाच्या या निर्णयाचे विविध स्तरांतून स्वागत करण्यात येत असून, अल्पवयीन मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये हा निकाल महत्त्वाचा मानला जात आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now