वरणगाव पोलिसांची धडक कारवाई! महामार्गावर ५.१७ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, एक जण अटकेत

जुलै 25, 2026 11:11 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । वरणगाव पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर मोठी कारवाई करत महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा, सुगंधित पानमसाला आणि तंबाखूची अवैध वाहतूक उघडकीस आणली. या कारवाईत सुमारे ₹५.१७ लाखाचा मुद्देमाल आणि वाहतूक करणारे वाहन जप्त करण्यात आले असून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. चेतन लक्ष्मण नारखेडे (वय २८, रा. खालची आळी, नशिराबाद, ता. जि. जळगाव) असं अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

crime 2 jpg webp

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ जुलै २०२६ रोजी रात्री ८.२० वाजण्याच्या सुमारास मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील कपिलवस्ती जवळ, मुक्ताईनगरकडे जाणाऱ्या मार्गावर सापळा रचण्यात आला. २५ जुलै रोजी पहाटे ३.३३ वाजता संशयित वाहनाची तपासणी केली असता महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेला मोठ्या प्रमाणात गुटखा, विमल पानमसाला, तंबाखू आणि इतर तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले.

या प्रकरणी चेतन नारखेडेला ताब्यात घेत त्याच्याविरुद्ध वरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान पोलिसांनी विविध कंपन्यांचा गुटखा, विमल पानमसाला, तंबाखू, केसी ब्रँड तंबाखू तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली इनोव्हा कार (एमएच-२० बीडी-३०००) जप्त केली. जप्त केलेल्या वाहनासह एकूण मुद्देमालाची किंमत ₹५,१७,८६८ इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अमितकुमार बागुल, पोलीस उपनिरीक्षक एस. के. बेंडकोळी, तसेच वरणगाव पोलिस ठाण्याच्या पथकाने केली. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस. के. बेंडकोळी करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now