महिलांसाठी सुवर्णसंधी! राज्यात अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांच्या ४,९४३ पदांची महाभरती

जुलै 22, 2026 3:59 PM

जळगाव लाईव्ह न्यूज | नोकरी संदर्भ । सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या महिलांसाठी आनंदाची बातमी असून महिला व बालविकास विभागाने राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांसाठी तब्बल ४,९४३ रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून ३१ जुलै २०२६ ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.

Anganwadi Bharti 1

पदांच तपशील

अंगणवाडी सेविका – १,०१५ पदे
अंगणवाडी मदतनीस – ३,९२८ पदे

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा

अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्ज करणारी महिला किमान बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे वय जाहिरात प्रसिद्ध झालेल्या दिवशी १८ ते ३५ वर्षे असावे. विधवा महिलांसाठी कमाल वयोमर्यादा ४० वर्षे ठेवण्यात आली आहे.
तसेच अर्जदार महिला संबंधित नगर परिषद, नगर पंचायत किंवा नगरपालिका क्षेत्रातील स्थानिक रहिवासी असणे बंधनकारक आहे.

मानधन किती मिळणार?

निवड झालेल्या उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार मासिक मानधन दिले जाईल.
अंगणवाडी सेविका – ₹१३,००० प्रतिमहिना
अंगणवाडी मदतनीस – ₹७,५०० प्रतिमहिना

अर्जासोबत ही कागदपत्रे आवश्यक

शैक्षणिक प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
स्थानिक रहिवासी असल्याचा पुरावा
स्वयंघोषणापत्र
शिधापत्रिका
डोमिसाइल किंवा रहिवासी प्रमाणपत्र
जन्म दाखला किंवा दहावीचे प्रमाणपत्र (वयाचा पुरावा)
३१ जुलैपूर्वी अर्ज करा

महिला व बालविकास विभागाने पात्र आणि इच्छुक महिलांना ३१ जुलैपूर्वी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करण्याचे आवाहन केले आहे. सरकारी सेवेत काम करण्याची इच्छा असलेल्या महिलांसाठी ही भरती मोठी संधी मानली जात आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now