जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जुलै २०२६ । गेल्या आठवड्यातील चढ-उतारानंतर या चालू आठवड्यात सलग दोन दिवस सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली होती. त्यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, आठवड्याच्या तिसऱ्याच दिवशी, म्हणजेच आज बुधवारी सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे खरेदीदारांना मोठा झटका बसला आहे. दुसरीकडे, चांदीचे दर मात्र आजही स्थिर आहेत.

Goodreturnsच्या आकडेवारीनुसार, जळगाव सराफ बाजारात 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमच्या दरात 770 रुपयांची वाढ झाली असून, तो 1,43,570 रुपये इतका झाला आहे. तसेच 22 कॅरेट सोन्याचा दर 700 रुपयांनी वाढून 1,31,600 रुपये झाला आहे. याशिवाय 18 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमचा भाव 570 रुपयांनी वाढून 1,07,670 रुपयांवर पोहोचला आहे.

दरम्यान, चांदीच्या बाजारात आज कोणतीही हालचाल दिसून आली नाही. एक किलो चांदीचा दर 2,35,000 रुपये इतकाच कायम राहिला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, डॉलरच्या विनिमय दरातील चढ-उतार आणि जागतिक आर्थिक परिस्थितीचा परिणाम सोन्या-चांदीच्या दरांवर होत असल्याचे सराफ व्यावसायिकांचे म्हणणे आहे. आगामी काळातही दरांमध्ये चढ-उतार कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.












