जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील सुवर्णनगरीत सोने-चांदीच्या दरात गेल्या २४ तासांत मोठी घसरण झाली आहे. चांदीच्या दरात तब्बल ७ हजार रुपयांची घट झाली असून, चांदीचा भाव आता २ लाख ४० हजार रुपये प्रतिकिलोवर आला आहे. तर सोन्याच्या दरातही २ हजार ८०० रुपयांची घसरण होऊन सोने १ लाख ५३ हजार ९०० रुपये प्रति दहा ग्रॅमवर आले आहे.

गेल्या पाच दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहेत. २८ ऑगस्ट रोजी चांदीच्या दरात १ हजार रुपयांची वाढ झाली होती. त्यामुळे चांदीचा भाव २ लाख ४७ हजार रुपये प्रतिकिलोवर पोहोचला होता. मात्र, दुसऱ्याच दिवशी म्हणजे २९ ऑगस्ट रोजी तब्बल ७ हजार रुपयांची घसरण झाल्याने चांदी २ लाख ४० हजार रुपयांवर आली.

याचप्रमाणे २८ ऑगस्ट रोजी सोन्याच्या दरातही १ हजार रुपयांची वाढ होऊन सोने १ लाख ५६ हजार ७०० रुपयांवर पोहोचले होते. मात्र, २९ ऑगस्ट रोजी सोन्याच्या दरात २ हजार ८०० रुपयांची घट झाली. त्यामुळे सोन्याचा भाव १ लाख ५३ हजार ९०० रुपयांवर आला आहे.
दरातील या मोठ्या चढ-उतारामुळे सोने-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे लक्ष आता आगामी दिवसांतील बाजारभावाकडे लागले आहे.










