जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जुलै २०२६ । सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आज (९ जुलै) सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात वाढ, तर चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. २४ कॅरेट सोन्याच्या १० तोळ्यांच्या दरात तब्बल १,१०० रुपयांची वाढ झाली असून, चांदीच्या १ किलोच्या दरात १०,००० रुपयांची घट नोंदविण्यात आली आहे.

एकीकडे अमेरिका आणि इराण मधील युद्ध पुन्हा भडकले असून या वाढत्या भू-राजकीय तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. यामुळे महागाईबाबतची चिंता पुन्हा वाढली असून, अमेरिकन बाँड यिल्ड आणि डॉलर मजबूत झाले आहेत. परिणामी, जागतिक बाजारातील सोन्याच्या किमतींवर दबाव निर्माण झाला असून त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारावरही दिसून येत आहे.

गुड रिटर्न्सच्या माहितीनुसार, आज २४ कॅरेट सोन्याचा दर १,४३,२४० रुपये प्रति १० ग्रॅम इतका आहे. तर चांदीचा दर २,३५,००० रुपये प्रति किलो इतका आहे. बाजारातील तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचाली आणि मागणीतील बदलामुळे पुढील काही दिवसांत चांदीच्या दरात आणखी चढ-उतार होण्याची शक्यता आहे. सोने-चांदी खरेदीचा विचार करणाऱ्यांनी व्यवहार करण्यापूर्वी स्थानिक सराफा बाजारातील ताजे दर तपासूनच खरेदी करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे.











