खुशखबर ! उधना-ब्रह्मपुरी अमृत भारत एक्स्प्रेस आता रोज धावणार; पाहा जळगाव-भुसावळची वेळ आणि थांबे

जुलै 8, 2026 4:50 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. पश्चिम रेल्वेने उधना–ब्रह्मपुरी–उधना अमृत भारत एक्स्प्रेस ही गाडी आता त्रि-साप्ताहिक ऐवजी दररोज चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जळगाव, भुसावळसह संपूर्ण खान्देशातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून गुजरात, विदर्भ, छत्तीसगड आणि ओडिशा या राज्यांमध्ये प्रवास अधिक सुलभ होणार आहे.

amritbharat

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक १९०२१ उधना–ब्रह्मपुरी अमृत भारत एक्स्प्रेस ९ जुलै २०२६ पासून दररोज उधना येथून सकाळी ७.१० वाजता सुटेल. ही गाडी दुपारी १२.३५ वाजता जळगाव आणि १.०५ वाजता भुसावळ स्थानकावर पोहोचेल. त्यानंतर पुढील दिवशी दुपारी १.५५ वाजता ब्रह्मपुरी येथे दाखल होईल.

गाडी क्रमांक १९०२२ ब्रह्मपुरी–उधना अमृत भारत एक्स्प्रेस ब्रह्मपुरी येथून रात्री ११.४५ वाजता सुटेल. तिसऱ्या दिवशी पहाटे २.०० वाजता भुसावळ आणि २.३८ वाजता जळगाव येथे पोहोचून सकाळी ८.४५ वाजता उधना (सुरत) येथे दाखल होईल.

ही गाडी बार्डोली, व्यारा, नवापूर, नंदुरबार, दोंडाईचा, सिंदखेडा, अमळनेर, धरणगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, महासमुंद, खारियार रोड, कांताबांजी, तितलागड, केसिंगा, मुनिगुडा, रायगडा, पार्वतीपूरम, बोब्बिली, विजयानगरम, श्रीकाकुलम रोड आणि पालासा या महत्त्वाच्या स्थानकांवर दोन्ही दिशांनी थांबा घेणार आहे.

दररोज सेवा उपलब्ध झाल्यामुळे प्रवाशांना प्रवासाचे नियोजन अधिक सोयीस्कर होणार असून, जळगाव आणि भुसावळ परिसरातील प्रवाशांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी मानली जात आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now