जळगाव लाईव्ह न्यूज । वनप्लस 15R गेल्या वर्षीच्या डिसेंबरमध्ये भारतात लॉन्च झाला होता. हा वनप्लस फोन 12GB रॅम पर्यायासह सादर करण्यात आला होता. कंपनीने आता 16GB रॅम व्हेरिएंट लॉन्च केला आहे. नव्या व्हेरिएंटमध्ये अधिक RAM देण्यात आली असून, फोनच्या इतर फीचर्समध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

किंमत किती?
या वनप्लस स्मार्टफोनचा 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज असलेला टॉप व्हेरिएंट 61 हजार 999 मध्ये लाँच करण्यात आला आहे. 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेल्या बेस व्हेरिएंटची किंमत 54 हजार 999 रूपये आहे, तर 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज असलेला व्हेरिएंट 59 हजार 999 रूपयांमध्ये विकला जात आहे. निवडक बँक कार्ड्स (HDFC, कोटक आणि IDFC कार्ड्स) वापरून या फोनवर 3,000 ची सूट देखील मिळत आहे.

वनप्लस 15R ची वैशिष्ट्ये
या फोनमध्ये मोठा ६.८३-इंचाचा FHD+ डिस्प्ले आहे. फोनचा डिस्प्ले २८०० x १२७२ पिक्सेल रिझोल्यूशनला सपोर्ट करतो. डिस्प्ले १६५Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो आणि तो कॉर्निंग गोरिला ग्लास 7i द्वारे संरक्षित आहे. यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे आणि त्याला IP66, IP68, IP69, आणि IP69K रेटिंग आहे.
प्रोसेसर :
यात Qualcomm Snapdragon 8 Gen 5 प्रोसेसर देण्यात आला आहे, जो गेमिंग आणि मल्टीटास्किंगसाठी उत्कृष्ट परफॉर्मन्स देतो.
कॅमेरा :
फोटोग्राफीसाठी 50MP ड्युअल रियर कॅमेरा आणि 32MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन 4K 120fps व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो. तसेच Clear Burst, Ultra Clear Mode आणि Clear Night Engine सारखी प्रगत कॅमेरा फीचर्सही उपलब्ध आहेत.
बॅटरी :
फोनमध्ये 7400mAh क्षमतेची मोठी बॅटरी देण्यात आली असून ती 80W SuperVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. त्यामुळे कमी वेळेत फोन चार्ज होऊन दीर्घकाळ वापरता येतो.












