जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । बँकेत नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत (MSC Bank) विविध पदांवर काम करण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेअंतर्गत विविध पदे भरली जाणार आहे. या भरतीद्वारे एकूण ३६ रिक्त पदे भरली जाणार आहे. MSC Bank Bharti 2026

विशेष म्हणजे या भरतीसाठी उमेदवारांना कोणतीही परीक्षा फी भरावी लागणार नाही. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना २२ जून २०२६ पूर्वी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे बंधनकारक आहे. MSC Bank Recruitment 2026

ही पदे भरली जाणार?
विशेष शाखा व्यवस्थापक (अधिकारी श्रेणी 2) 30 पदे
शाखा व्यवस्थापक 06 पदे
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 10-12 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : 01 मे 2026 रोजी 45 ते 62 वर्षे
परीक्षा फी : फी नाही
इतका पगार मिळेल?
विशेष शाखा व्यवस्थापक (अधिकारी श्रेणी 2) : 60,000/-
शाखा व्यवस्थापक : 83,000/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Deputy General Manager (OSD), HRD&M Department, The Maharashtra State Co-operative Bank Ltd., Mumbai, Sir Vithaldas Thackersey Smruti Bhavan, 9, Maharashtra Chamber of Commerce Lane, Fort, Mumbai – 400 001.
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख: 22 जून 2026












