बातम्यावाणिज्य

कमर्शिअल सिलिंडर पुन्हा महागला! १ जूनपासून नवे दर लागू; आता जळगावात नवीन दर काय?

जळगाव लाईव्ह न्यूज । १ जून २०२६ । सर्वसामान्य नागरिक गाढ झोपेत असताना, तेल विपणन कंपन्यांनी गुपचूपपणे महागाईचा आणखी एक डोस दिला आहे. गॅस कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या आणि एलपीजीच्या किमतींमधील चढ-उतारानुसार ही दरवाढ करण्यात आल्याचे कंपन्यांनी सांगितले आहे. हे नवीन दर आज, १ जून २०२६ पासून लागू झाले आहेत.

कंपन्यांनी घेतलेल्या या निर्णयानंतर, आजपासून १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत ₹४२ ने वाढली आहे. त्यामुळे जळगावात या सिलिंडरची नवीन किंमत आता ₹३१५७ रुपये झाली आह. दिलासादायक म्हणजे घरगुती गॅस सिलिंडरचे दर मात्र स्थिर ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे गृहिणींचे महिन्याचे बजेट कोलमडण्यापासून तूर्तास वाचले आहे.

आखाती देशात युद्ध सुरू झाल्यापासून कमर्शिअल सिलिंडरच्या किमतीत तब्बल १,३७३ रुपयांची वाढ झाली आहे. यामध्ये मागील महिन्यात झालेल्या ९९३ रुपयांच्या मोठ्या वाढीचाही समावेश आहे. या तुलनेत घरगुती गॅस सिलिंडरचे दर या काळात फक्त ६० रुपयांनी वाढले आहेत. देशभरात घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. जळगावात हा सिलिंडर ९१८ रुपयांना मिळत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button