
जळगाव लाईव्ह न्यूज । २३ एप्रिल २०२६ । अमेरिका आणि इराणमधील शस्त्रसंधी चर्चेची दुसरी फेरी निष्फळ ठरल्याने जागतिक राजकारणात अनिश्चिततेचे ढग गडद झाले आहेत. या भू-राजकीय तणावाचा थेट परिणाम कमोडिटी मार्केटवर झाला असून, जागतिक बाजारात डॉलर आणि कच्च्या तेलाला बळकटी मिळाली असली, तरी मौल्यवान धातूंच्या किमतीत मात्र मोठी घसरण पाहायला मिळत आहे. Gold Silver Rate Today
आज गुरुवारी सराफ बाजार उघडताच सोन्यासह चांदी दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. यामुळे लग्नसराईसाठी दागिने बनविणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, सोने दरात घसरण झाली असली तरी अद्यापही सोन्याचा प्रति तोळ्याचा दर दीड लाखापेक्षा जास्त आहे.
सोन्याचा दर
goodreturns वेबसाईटच्या माहितीनुसार, आज सकाळी सराफ बाजार उघडताच २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळा १२०० रुपयाची घसरण झाली. त्यामुळे सोन्याचा दर १,५३,५५० रूपावर पोहोचले. ८ ग्रॅमचा दर ९६० रुपयांनी घसरून १,२२,८४० रुपयावर पोहोचले. तसेच २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा ११०० रुपयांनी घसरून १,४०,७५० रुपयावर पोहोचला. तर २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा ९०० रुपयांनी घसरून १,१५,१६० रुपयावर पोहोचला.
चांदीचा दर
सोन्यापाठोपाठ आज चांदी दरातही मोठी घसरण झाली आहे. आज चांदी दरात प्रति किलो ५००० रुपयाची घसरण झाली. यामुळे आता चांदीचा एक किलोचा दर २,६०,००० रुपयावर पोहोचला.




