नाशिक करन्सी नोट प्रेसमध्ये सरकारी नोकरीची मोठी संधी; ५३४ पदांसाठी भरती..

मे 20, 2026 6:52 PM

सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. नाशिक येथील ‘करन्सी नोट प्रेस’ (Currency Note Press) द्वारे विविध पदांसाठी मोठी पदभरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण ५३४ रिक्त जागा भरल्या जाणार असून, यासाठीची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. Currency Note Press Nashik Bharti 

Currency Note Press Nashik 1

या भरतीसाठी इच्छुक उमेदवार cnpnashik.spmcil.com या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज भरू शकतात. अर्ज प्रक्रिया सुरू असून इच्छुक आणि पात्र उमेदवार ३ जून २०२६ पर्यंत अर्ज करू शकतो

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1वेल्फेअर ऑफिसर02
2सेफ्टी ऑफिसर01
3सुपरवायझर (टेक्निकल कंट्रोल)27
4सुपरवायझर (TO – प्रिंटिंग)25
5सुपरवायझर (IT)06
6सुपरवायझर (TO – मेकॅनिकल)07
7सुपरवायझर (TO – AC)03
8सुपरवायझर (TO – इलेक्ट्रिकल)08
9सुपरवायझर (TO – इलेक्ट्रॉनिक्स)09
10सुपरवायझर (इंक फॅक्टरी)03
11सुपरवायझर (मेकॅनिकल / एअर कंडिशनिंग)03
12सुपरवायझर (इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स)03
13सुपरवायझर (TO – सिव्हिल)03
14सुपरवायझर (TO – इन्स्ट्रुमेंटेशन)01
15सुपरवायझर (ऑफिशियल लँग्वेज)01
16सेक्रेटेरियल असिस्टंट01
17आर्टिस्ट (ग्राफिक डिझाईन)01
18ज्युनियर ऑफिस असिस्टंट22
19ज्युनियर टेक्निशियन (प्रिंटिंग)108
20ज्युनियर टेक्निशियन (कंट्रोल)227
21ज्युनियर टेक्निशियन (इलेक्ट्रिकल)12
22ज्युनियर टेक्निशियन (इलेक्ट्रॉनिक्स)15
23ज्युनियर टेक्निशियन (मशीनिस्ट)08
24ज्युनियर टेक्निशियन (फिटर)20
25ज्युनियर टेक्निशियन (मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स / फिटर)03
26ज्युनियर टेक्निशियन (इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन)01
27ज्युनियर टेक्निशियन (स्टोअर)02
28ज्युनियर टेक्निशियन (एअर कंडिशनिंग)02
29ज्युनियर टेक्निशियन (इंक फॅक्टरी – अटेंडंट ऑपरेटर)03
30ज्युनियर टेक्निशियन (इंक फॅक्टरी – लॅबोरेटरी असिस्टंट)03
31ज्युनियर टेक्निशियन (मेकॅनिकल / एअर कंडिशनिंग)02
32ज्युनियर टेक्निशियन (इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स)02
Total534

पात्रता काय ?

१०वी उत्तीर्ण किंवा आयटीआय, अभियांत्रिकी पदविका, पदवी/पदव्युत्तर पदवी. (पदांनुसार पात्रता वेगवेगळी आहे.) किमान वय १८ वर्षांपेक्षा कमी नसावे आणि पदनिहाय कमाल वय २५/२८/३० वर्षांपेक्षा जास्त नसावे. तथापि, राखीव प्रवर्गांसाठी वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्षे
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/ESM: 1000/- रुपये. [SC/ST/PwBD: 200/- रुपये]
वेतनश्रेणी (Pay Scale) : 18,780/- रुपये ते 1,03,000/- रुपये.

भरतीची जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :येथे क्लीक करा

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now