जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । देशसेवेची ओढ असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाने (CRPF) तब्बल 9195 कॉन्स्टेबल पदांसाठी भरतीची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. विशेष म्हणजे केवळ 10 वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी आहे. CRPF Constable Bharti 2026

या भरतीसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया 20 एप्रिल 2026 पासून सुरू होणार आहे. इच्छुक उमेदवार rect.crpf.gov.in या अधिकृत वेबसाइटद्वारे या भरतीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ मे २०२६ निश्चित करण्यात आली आहे. CRPF Constable Recruitment 2026

रिक्त पदांचा तपशील
1) कॉन्स्टेबल (ट्रेड्समन & टेक्निकल) – 9175 पदे
2) कॉन्स्टेबल (पायोनियर विंग) – 20 पदे
शैक्षणिक पात्रता:
कॉन्स्टेबल (ड्रायव्हर): (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना
कॉन्स्टेबल (मेकॅनिक मोटर व्हेईकल): (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (मेकॅनिक मोटर व्हेईकल) (iii) 01 वर्ष अनुभव
कॉन्स्टेबल (पायोनियर विंग): (i) 10वी उत्तीर्ण (ii) मेसनरी किंवा इलेक्ट्रिशियन ट्रेड मध्ये 01 वर्ष अनुभव
उर्वरित ट्रेड: 10वी उत्तीर्ण
वयाची अट: 01 जानेवारी 2026 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
कॉन्स्टेबल (ड्रायव्हर): 21 ते 27 वर्षे
उर्वरित ट्रेड: 18 ते 23 वर्षे
पगार किती असेल?
निवड झालेल्या उमेदवारांना चांगले वेतन पॅकेज मिळेल. ७ व्या वेतन आयोगाअंतर्गत, पगार ₹21,700 ते ₹96,100 पर्यंत असेल. इतर शासकीय भत्ते देखील उपलब्ध असतील.
अर्ज शुल्क :
सर्वसाधारण, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील पुरुषांसाठी अर्ज शुल्क ₹100 आहे, तर महिला आणि एससी/एसटी प्रवर्गासाठी अर्ज शुल्क मोफत आहे.
निवड प्रक्रिया कशी पार पडेल?
निवड प्रक्रिया चार टप्प्यांत पूर्ण केली जाईल. प्रथम, संगणक-आधारित परीक्षा होईल, ज्यामध्ये सामान्य ज्ञान, गणित, तर्कशास्त्र आणि भाषा या विषयांवरील प्रश्नांचा समावेश असेल. यानंतर शारीरिक परीक्षा होईल, ज्यामध्ये धावण्याची आणि शारीरिक क्षमता तपासली जाईल. तिसरा टप्पा ट्रेड टेस्ट असेल, ज्यामध्ये संबंधित कामाचा अनुभव तपासला जाईल. शेवटी, कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी होईल. हे सर्व टप्पे पार केल्यानंतरच उमेदवारांची निवड केली जाईल.












