धुळ्यात ट्रॅक्टर अपघातात धरणगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू ; दुसरा गंभीर जखमी

एप्रिल 8, 2026 12:26 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । धुळ्याच्या साक्री तालुक्यातील रायतेलजवळ झालेल्या भीषण ट्रॅक्टर अपघातात धरणगाव (जि. जळगाव) येथील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. विलास दत्तू देसाई (वय २६, रा. धरणगाव) असं मयत तरुणाचं नाव असून या दुर्घटनेत अन्य दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी साक्री पोलिसांनी वीटभट्टी मालकावर गुन्हा दाखल केला आहे.

jalgaon mahanagar palika 10 jpg webp

रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास कोंडाईबारी ते रायतेल गुलतारा रस्त्यावर हा अपघात झाला. वीटभट्टी मालक पिंटू जंगलू कुमार (रा. धरणगाव, ता. अमळनेर) हा एमएच २८ टी ८७४२ क्रमांकाच्या ट्रॅक्टरमध्ये विटा भरून जात असताना रायतेलनजीक ट्रॅक्टरच्या पुढील उजव्या बाजूची बेरिंग अचानक तुटली. यामुळे ट्रॅक्टर थेट रस्त्याशेजारील झाडावर धडकले.

अपघातात चालकाच्या सीटजवळ बसलेला विलास देसाई हा जागीच ठार झाला. तर राजेश उमेश देसाई हा अपघातात गंभीर जखमी झाला. याप्रकरणी अजय वसंत देसाई यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, साक्री पोलिस ठाण्यात वीटभट्टी मालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now