जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेत गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात मोठे चढ-उतार पाहायला मिळत असून काल गुरुवारी झालेल्या घसरणीनंतर आज शुक्रवारी पुन्हा दरवाढ नोंदविण्यात आली. या सततच्या बदलामुळे ग्राहकांनी खरेदी करताना सावध भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.

सोन्याचा दर
जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत शुक्रवारी सकाळी २४ कॅरेट सोने दरात ४०८ रुपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ४७ हजार ५९९ रुपयांपर्यंत पोहचले. यापूर्वी काल गुरुवारी सोने दरात ३१९३ रुपयांची घट झाली होती मात्र आजच्या दरवाढीने ग्राहकांना झटका बसला आहे.

चांदीचा दर
आज सोन्यापाठोपाठ चांदी दरातही मोठी वाढ झाली आहे. सकाळी चांदी दरात प्रति किलो ३०९० रुपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो दोन लाख ३७ हजार ९३० रुपयांपर्यंत पोहचले. यापूर्वी गुरुवारी दिवसभरात चांदीत तब्बल १३ हजार ३९० रुपयांची घट झाली होती.
पश्चिम आशियातील तणाव कमी होण्याची चिन्हे दिसू लागल्याने आणि अमेरिकन डॉलर कमकुवत झाल्यामुळे सोन्या-चांदीच्या किमतींना पुन्हा आधार मिळाला. त्यामुळे पुढील काही दिवसांतही किमतींमध्ये अस्थिरता कायम राहण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदारांनी या परिस्थितीत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे आणि दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवूनच निर्णय घेणे अधिक योग्य ठरेल, असे जाणकारांचे मत आहे.












