जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । सरकारी बँकेत नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी खुशखबर आहे. बँक ऑफ बडोदा मध्ये भरतीची निघाली आहे. ग्रुप हेड, टेरिटरी हेड आणि डेप्युटी मॅनेजर पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २७ मार्चपासून सुरू होईल. इच्छुक आणि पात्र उमेदवार १६ एप्रिल २०२६ पर्यंत अर्ज करू शकतील. Bank of Baroda Bharti 2026

कोण अर्ज करू शकतो?
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी भारतातील मान्यताप्राप्त संस्थेतून पदवी पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, उमेदवारांकडे व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदवी आणि डिप्लोमा असणे आवश्यक आहे.

अर्ज करण्यासाठी किमान वय पदानुसार २४, २७ आणि ३१ वर्षे आहे. कमाल वय अनुक्रमे ३५, ४० आणि ४५ वर्षे आहे.राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये सवलत देखील दिली जाईल. अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) उमेदवारांना पाच वर्षांची, तर इतर मागास प्रवर्गातील (OBC) उमेदवारांना तीन वर्षांची वयामध्ये सवलत दिली जाते.
नोंदणी शुल्क
सर्व प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज करण्यासाठी नोंदणी शुल्क भरणे आवश्यक आहे. सर्वसाधारण, EWS आणि OBC उमेदवारांसाठी नोंदणी शुल्क ₹850 आहे, आणि SC, ST आणि दिव्यांग उमेदवारांसाठी नोंदणी शुल्क ₹175 आहे.












