धक्कादायक ! धरणगावात हत्या करून तरुणाचा मृतदेह रेल्वे रुळावर फेकला

मार्च 24, 2026 2:32 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । धरणगाव तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. बांभोरी (ता.धरणगाव) शिवारात तरुणाची हत्या करून मृतदेह रेल्वे रुळावर फेकल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

train crime jpg webp

बांभोरी येथे सुरत-भुसावळ रेल्वे मार्गावर रेल्वे कर्मचाऱ्यांना एक अनोळखी मृतदेह आढळला. त्यांनी पाळधी पोलिस दूरक्षेत्रास माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला. हत्या करून मृतदेह रेल्वे रूळावर फेकला असावा असा पोलिसांचा कयास आहे. रेल्वे पुलाजवळ पुलाखाली बोगद्यात राहणारे व पाण्याच्या बाटल्या गोळा करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबातील सखुबाईने तो मृतदेह आपला पती पिंटू अमोशा बारेला (वय ३५) असल्याचे ओळखले.

हे कुटुंब मध्य प्रदेशातील बडवाणी जिल्ह्यातील आहे. मृताची पत्नी व साक्षीदार कैलास बारेला यांनी आरोपी सुनील सिताराम बारेला (वय ३०) याने रात्री सोबत दारू पिल्याचे सांगितले, तसेच खिशातील पैसे काढल्याच्या रागातून लाकूड, दगड व चाकूने पिंटूला मारून रेल्वे रुळावर टाकून दिले असल्याचा संशय व्यक्त केला. त्यानुसार सुनील बारेला याला पाळधी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत मृताची पत्नी सखूबाई बारेला यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. डीवायएसपी अण्णासाहेब घोलप, धरणगावचे पोलिस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पाळधी दूरक्षेत्राचे एपीआय प्रशांत कंडारे व सहकारी पोलिस कर्मचारी तपास करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now