सोन्याचा भाव पुन्हा एकदा घसरले ; आता एक तोळ्यासाठी मोजावे लागणार ‘इतके’ रुपये?

मार्च 13, 2026 11:44 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मार्च २०२६ । एकीकडे जागतिक अस्थिरतेमुळे शेअर बाजार गडगडला असून दुसरीकडे देशांतर्गत सराफ बाजारात सोने दरात घसरण दिसून येत आहे. आज आज पुन्हा एकदा सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ९८० रुपयांनी घसरले आहेत. सोबतच चांदी दरातही किंचित घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला. Gold Silver Price Today

gold

काय आहेत सोन्याचा दर

आज २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ९८० रुपयांनी घसरून १,६१,२४० रुपयावर पोहोचले. तर आज २२ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ९०० रुपयांनी घसरले आहेत हे दर १,४७,८०० रुपये झाले आहेत. सोबतच आज १८ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ७४० रुपयांनी घसरले आहेत हे दर १,२०,९३० रुपये झाले आहेत.

कालदेखील सोन्याची किंमत कमी झाली होती. आजदेखील हे दर कमी झाल्यामुळे भविष्यात हे दर आणखी कमी व्हावेत, अशी अपेक्षा आहेत. सोन्याचे दर कमी झाले असले तरीही हे दर दीड लाखांच्या पुढेच आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसत आहे.

दरम्यान सोन्यापाठोपाठ आज चांदी दरातही घसरण झालीय. चांदी दरात किंचित १०० रुपयांची घसरण होऊन ते २,७९,९०० रुपये प्रति किलोवर पोहोचली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now