एरंडोल हादरले ! ५७ वर्षांच्या नातेवाईकाकडून ४ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार

मार्च 11, 2026 12:42 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । राज्यात महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नसून अशातच एरंडोलमधून नात्याला काळिमा फासणारी संतापजनक घटना समोर आलीय. ५७ वर्षांच्या नातेवाईकानेच ४ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना शहरातील लांडापुरा भिलाटी परिसरात घडली. या घटनेप्रकरणी एरंडोल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली असून पोलिसांनी संशयित व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

image 46 jpg webp

मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल शहरातील केवडीपुरा येथील एक महिला आपल्या कुटुंबासह लांडापुरा भिलाटी परिसरात राहत आहे. मंगळवारी दुपारी सुमारास ती महिला घराजवळील शौचालयास गेली होती. त्यावेळी तिची तिन्ही लहान मुलं घरात खेळत होती. काही वेळानंतर ही महिला घरी परत आली. तिची ४ वर्षांची मुलगी घरात दिसून आली नाही. यामुळे महिलेने परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली.

दरम्यान शेजारी राहणाऱ्या नातेवाईकाच्या घरी जाऊन चौकशी केली असता त्याच्या घरातच संशयास्पद परिस्थितीमध्ये मुलगी दिसून आली. महिलेने या मुलीला तात्काळ आपल्या घरी आणले. नातेवाईकानेच आपल्या चिमुकल्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याने महिलेला मोठा धक्का बसला. या घटनेनंतर महिलेने तात्काळ पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

या प्रकरणी पीडितेच्या आईच्या फिर्यादीवरून संबंधित व्यक्तीविरुद्ध एरंडोल पोलिस ठाण्यात लैंगिक अत्याचारासंदर्भातील गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा म्हणजेच पोक्सो कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेचा पुढील तपास एरंडोल पोलिस करत आहेत. या घटनेमुळे जळगावमध्ये खळबळ उडाली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now