जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । जर तुम्ही सरकारी बँकेत नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आयडीबीआय बँकेने मोठी पदभरती जाहीर केली असून या भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलीय. असिस्टंट मॅनेजर-ग्रेड A आणि ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (JAM) ग्रेड O या पदांसाठी ही भरती जाहीर केली आहे. IDBI Recruitment 2026

या भरतीद्वारे तब्बल १३०० जागा भरल्या जाणार आहे. भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ मार्च २०२६ आहे. इच्छुक उमेदवारांनी या तारखेपर्यंत किंवा त्यापूर्वी अर्ज करावा. IDBI Bharti 2026

रिक्त पदाचे नाव :
१) असिस्टंट मॅनेजर-ग्रेड A – २००
२) ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (JAM) ग्रेड O – ११००
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) पदवीधर (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.2: 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST/PwBD: 55% गुण]
वयाची अट: 01 मार्च 2026 रोजी, 20 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा शुल्क : या भरतीसाठी अर्ज शुल्क सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी ₹१०५० आहे, तर एससी, एसटी आणि पीएच (दिव्यांग) उमेदवारांना ₹२५० भरावे लागतील











