LPG सिलेंडरच्या किमती पुन्हा वाढल्या ; तुमच्या शहरातील दर तपासा

मार्च 1, 2026 7:41 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १ मार्च २०२६ । गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. १ मार्च २०२६ रोजी सरकारने एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ केली. तथापि, ही वाढ व्यावसायिक गॅस सिलिंडर (१९ किलो) वर लागू होते. त्यामुळे व्यावसायिकांच्या खिशाला चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे. घरगुती स्वयंपाकाच्या गॅसची (१४ किलो) किंमत अद्यापही बदललेली नाही.

gas subsidy

संपूर्ण देशभरात कमर्शियल एलपीजी गॅसच्या किंमती बदलल्या आहेत. या किंमतीत २८ रुपयांनी वाढ झाली आहे. आता तुम्हाला १९ किलो वजनाचा एलपीजी गॅस सिलेंडर १७६८.५० रुपयांना मिळणार आहे. याआधी हा दर १७४०.५० रुपये होता. त्यामुळे रेस्टॉरंट, हॉटेल आणि लहान व्यवासायिकांना फटका बसण्याची शक्यता आहे

दरम्यान, मागच्या काही महिन्यापासून घरगुती गॅसच्या किमती जैसे थे आहेत. घरगुती गॅसच्या किंमती मुंबईत ८५२.५० रुपये आहेत. घरगुती गॅस हा १४.२ किलोचा असतो. दिल्लीत घरगुती गॅसच्या किंमती ८५३ रुपये आहेत. कोलकत्त्यात घरगुती गॅसच्या किंमती ८७९ रुपये आहेत. चेन्नईत घरगुती गॅसच्या किंमती ८६८.५० रुपये आहेत.

एलपीजी गॅसच्या किंमती या अनेक घटकावर अवलंबून असतात. हे दर आयपीपीद्वारे ठरवले जातात. यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारातील गॅसच्या किंमती, डॉलर रुपया आणि मालवाहतून याचसोबत कर यावर हे दर ठरवले जातात. कर आणि लॉजिस्टिकचा खर्च हा राज्यानुसार बदलतो. त्यामुळे एलपीजीच्या किंमतींमध्ये फरक पडतो.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now