जळगाव लाईव्ह न्यूज । रावेर शहरापासून काही अंतरावर सावदा रोडने पारशाच्या नाल्याजवळ तिघांनी एका किराणा दुकानदाराला अडवून १५ हजार रुपये हिसकावून पळ काढल्याची घटना घडली होती. अखेर रावेर येथील पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने २४ तासात जबरी चोरी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या असून ३० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी संशयित मोहंमद उबेद मोहंमद एजाज (रा. नागझिरी चौक रावेर), शेख मोईन शेख नईम (रा. विवरे बुद्रुक), रेहानखान जावेद खान (रा. विवरे बुद्रुक ता. रावेर) यांना अटक करण्यात आली आहे.

रावेरातील गोवर्धनदास सफरमल कोटवाणी यांचे किरणा होलसेल व रिटेलचे दुकान असून १८ फेब्रुवारीला विवरे बुद्रुक येथे वसुलीसाठी गेले होते. तेथून परत येण्यासाठी उभे असताना एक अनोळखी एका मोटारसायकल चालक त्यांच्याजवळ आला. तसेच मी रावेर जातो आहे. माझ्या सोबत चला असे सांगितले. त्यामुळे गोवर्धनदास कोटवाणी संबंधिताच्या मोटारसायकलवर बसले. रावेरकडे येत असतांना पारश्या नाल्याजवळ पोलिस चौकीचे शेजारी शेताच्या बाजूला दुचाकी चालकाने मोटारसायकल थांबवली. या ठिकाणी दोन अनोळखी व्यक्ती थांबल्या होत्या.
या वेळी कोटवाणी यांना धमकी देत त्यांच्या जवळ असलेले १५ हजार रुपये खिशातून काढून तेथून संशयितांनी पळ काढला. या प्रकरणी रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाख्ला झाला होता. पोलिसांनी संशयित आरोपी मोहंमद उबेद मोहंमद एजाज (रा. नागझिरी चौक रावेर), शेख मोईन शेख नईम (रा. विवरे बुद्रुक), रेहानखान जावेद खान (रा. विवरे बुद्रुक ता. रावेर) यांना अटक केली. चोरीस गेलेले १५ हजार रुपये रोख व गुन्ह्यात वापरण्यात आलेली ३५ हजार रुपयांची मोटारसायकल जप्त केली. पोलिस उपनिरीक्षक सुनील मोरे तपास करता आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनील मोरे, कल्पेश मुरलीधर आमोदकर, सुकेश शब्बीर तडवी, प्रमोद सुभाष पाटील, विशाल शिवाजी पाटील, संभाजी बिजागरे, श्रीकांत शिरीष चव्हाण, गजानन लक्ष्मण बोने, यांच्या पथकाने केली.










