जळगाव लाईव्ह न्यूज । २० फेब्रुवारी २०२६ । भू-राजकीय तणाव आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित गुंतवणूक म्हणून अनेकजण सोने खरेदीकडे वळले आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सोनं आणि चांदीच्या किंमतीमध्ये चढ उतार पाहायला मिळतोय. दरम्यान, आज सराफा बाजार उघडताच सोन्याच्या किमतीमध्ये घसरण नोंदवण्यात आली. दुसरीकडे चांदीचा दर स्थिर दिसून आला.

काय आहेत सोन्याचा दर?
देशांतर्गत मार्केटमध्ये २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा १५६,३२० रुपये आहे. गुरूवारी ही किंमत १५६,६४० रुपये होती. २४ कॅरेट सोन्याची किंमत ३२० रूपयांनी घसरली आहे. तर २२ कॅरेट सोन्याची किंमत ३०० रूपयांनी घसरून १,४३,३०० रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे. १८ कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा ₹११७,२८० आहे. गुरूवारच्या तुलनेत २४० रूपयांनी सोन्याची किंमत घसरली आहे.

आज सकाळी बाजार उघडल्यानंतर चांदी दरात कोणताही बदल दिसून आला नाहीय. साध्य एक किलो चांदीचा दर २,७०,००० रुपये इतका आहे.
जळगावातील भाव?
दरम्यान, गुरुवारी जळगाव सराफ बाजारात सोन्यासह चांदीचा दर मोठी वाढ दिसून आली. गुरुवारी सोने २४७२ रुपयांनी तर चांदी ७२३० रुपयांनी महागली. यानंतर सोन्याचा दर १,५९,८५६ रुपये प्रति तोळा इतका होता तर चांदीचा दर २,५८,५३० रुपये प्रति किलोवर स्थिरावली आहे.












