जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत विविध विभागांतील एकूण 222 पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु असून पात्र उमेदवारांना 18 मार्च 2026 पर्यंत अर्ज करता येणार आहे. Chhatrapati Sambhajinagar Mahanagarpalika Bharti

या पदांसाठी होणार भरती?
1) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – 32
2) उपअग्निशमन केंद्र अधिकारी -04
3) सहाय्यक सुरक्षा अधिकारी -01
4) स्थापत्य अभियांत्रिकी / अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक -24
5) स्वच्छता निरीक्षक -12
6) पशुधन पर्यवेक्षक -07
7) चालक-यंत्रचालक (Driver Operator) -15
8) उद्यान सहाय्यक / कृषी सहाय्यक -06
9) अनुलेखक (ट्रेसर) -09
10) अग्निशामक- 100
11) रोखपाल -12

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: स्थापत्य अभियांत्रिकी (Civil) पदवी
पद क्र.2: स्टेशन ऑफिसर & इन्स्ट्रक्टर किंवा उप स्थानक अधिकारी व अग्निप्रतिबंधक अधिकारी कोर्स किंवा डिव्हिजनल फायर ऑफिसर किंवा B.E. (Fire)
पद क्र.3: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) लष्कर, निमलष्करी दलातील समकक्ष पद अथवा पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उप निरीक्षक अथवा समकक्ष पदावरील किमान 03 वर्षांचा अनुभव आवश्यक.
पद क्र.4: (i) स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाचा पाठ्यक्रम उत्तीर्ण. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
पद क्र.5: (i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी. (ii) स्वच्छता निरीक्षक पदविका उत्तीर्ण.
पद क्र.6: (i) 12वी उत्तीर्ण (ii) पशुसंवर्धन डिप्लोमा (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अग्निशमन प्रशिक्षण कोर्स (iii) जड वाहन चालक परवाना (iv) 03 वर्षे अनुभव
पद क्र.8: (i) B.Sc (हॉर्टिकल्चर्स) ॲग्रीकल्चर/बॉटनी/फॉरेस्ट्री पदवी/ मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पती शास्त्रातील पदवी. (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Tracer/Draftsman)
पद क्र.10: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अग्निशमन प्रशिक्षण कोर्स
पद क्र.11: (i) B.Com (ii) संगणकावर मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 जानेवारी 2026 रोजी, 18 ते 40 वर्षांपर्यंत[मागासवर्गीय/अनाथ/आदुघ: 05 वर्षे सूट]
अर्ज शुल्क
खुला प्रवर्ग: ₹1000/-
मागासवर्गीय/अनाथ: ₹900/-












