आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्या-चांदीची मोठी उसळी; आताचे भाव वाचलेत का?

फेब्रुवारी 9, 2026 12:22 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ फेब्रुवारी २०२६ । एकीकडे लग्नसराईची धामधूम सुरु असताना अशातच सोन्यासह चांदी दरात मोठी वाढ झाल्याने दोन्ही धातूंनी विक्रमी उच्चांक गाठला आहे. दर वाढल्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. दरम्यान आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोने दरात मोठी वाढ झाली आहे. सोबतच चांदीच्या दराने देखील मोठी उसळी घेतल्याचं पाहायला मिळाले. आज सोनं-चांदी खरेदी करताना ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

gold silver 1 jpg webp

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात २,२४० रुपयांनी वाढ झाली आहे. आज २४ कॅरेटचे एक तोळा सोनं खरेदीसाठी १,५८,८४० रुपये खर्च करावे लागणार आहेत. तर २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये २,०५० रुपयांनी वाढून १,४५,६०० रुपयावर पोहोचले.

दरम्यान, सोन्यापाठोपाठ आज चांदीच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. आज १ ग्रॅम चांदी खरेदीसाठी आज तुम्हाला ३०० रुपये खर्च करावे लागणार आहे. तर १ किलो चांदीचे दर तब्बल १५,००० रुपयांनी वाढले आहेत. ही चांदी खरेदीसाठी आज तुम्हाला ३,००,००० रुपये खर्च करावे लागणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now