मकर संक्रातीपूर्वी सोने-चांदी दरवाढीचा नवा विक्रम; भाव वाचून ग्राहकांना फुटला घाम

जानेवारी 13, 2026 11:49 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जानेवारी २०२६ । मकर संक्रातीच्या पूर्वसंध्येला सोने आणि चांदी दराने नवीन विक्रमी पातळी गाठली आहे. या आठवड्याच्या सलग दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली. अचानक दोन्ही धातूं नव्या उच्चांकीवर पोहोचल्याने ग्राहकांना चांगलाच घाम फुटला.

gold silver

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज १ तोळा सोन्याच्या दरात ३८० रुपयांची वाढ झाल्याने २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीविना १,४२,५३० रुपयावर पोहोचले आहे. तर जीएसटीसह १,४६,८०५ रुपयावर पोहोचले आहे. आज २२ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील मोठी वाढ झाली. २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ३५० रुपयांनी वाढ झाली. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला जीएसटीविना १,३०,६५० रुपये खर्च करावे लागणार आहे.

दरम्यान, सोन्यापाठोपाठ चांदीच्या दरात देखील आज वाढ झाली. आज १ किलो चांदीच्या दरात तब्बल ५,००० रुपयांनी वाढ झाली आहे. ही चांदी खरेदीसाठी आज तुम्हाला २,७५,००० रुपये खर्च करावे लागणार आहे.

दरवाढीचे कारण काय?
सोन्या-चांदीच्या दरातील ही वाढ आंतरराष्ट्रीय घटनांमुळे होत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर 500 टक्के कर लावण्याच्या तयारीत आहेत. यामुळे अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापार युद्ध तीव्र होऊ शकते. हे युद्ध सोने आणि चांदीला सुरक्षित गुंतवणूक म्हणून मागणी वाढवते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now