नोकरीचे आमिष दाखवून लाखोंचा चुना.. वरणगावात पुण्याच्या महिलेविरोधात गुन्हा दाखल

जानेवारी 3, 2026 3:49 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून गंडा घातला जात असल्याचे प्रमाण वाढत असल्याचं दिसत आहे. असाच एक प्रकार वरणगावमधून समोर आलाय. ज्यात पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात नोकरीचे आमिष दाखवून एका व्यक्तीसह त्यांच्या नातेवाईकांची ७ लाख ७९ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी पुणे येथील एका महिलेविरोधात वरणगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

fraud jpg webp

या घटनेबाबत असे की, वरणगाव सीनियर कॉलेजमध्ये प्रयोगशाळा परिचर म्हणून कार्यरत असलेले अतुल शिवाजीराव शेटे (वय ५८, रा. अजयनगर, वरणगाव) यांना आणि त्यांच्या ओळखीच्या लोकांना ऑगस्ट २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत पुण्याच्या आरोपी नेहा निनाद नाईक हिने पुणे महानगरपालिकेत रिक्त जागांवर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले.

आरोपी महिलेने फिर्यादी अतुल शेटे यांच्यामार्फत त्यांच्या नातेवाईकांना आरोग्य विभागात विविध पदांवर नोकरी देण्याचे आश्वासन देऊन वेळोवेळी ४ लाख ८० हजार रुपये उकळले. याव्यतिरिक्त, इतर साक्षीदारांकडून (श्रद्धा शेटे, श्रद्धा जोशी, रेणुका महाजन व विजय घोसास) आरोपीने नोकरीच्या नावाखाली २ लाख ९९ हजार रुपये परस्पर घेतले. अशा प्रकारे एकूण ७ लाख ७९ हजार रुपये घेऊनही कोणालाही नोकरी दिली नाही आणि घेतलेले पैसेही परत न करता पोबारा केला.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अतुल शेटे यांनी वरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी नेहा निनाद नाईक (रा. पुणे) हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पीएसआय मंगेश बेडकोळी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now