जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जानेवारी २०२६ । नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या दोन दिवसात सोने दरात वाढ दिसून आली. मात्र आज ३ जानेवारी रोजी सोन्याच्या दरात घसरण दिसून आली. ३८० रूपयांनी सोन्याच्याकिंमतीत घसरण नोंदवण्यात आली आहे.

आज शनिवारी सराफा बाजार उघडताच सोन्याचे दर घसरले आहे. यानंतर सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा ₹१३५,९७० इतकी झाली आहे. शुक्रवारी ही किंमत १३६,३५० रूपये इतकी होती. २२ कॅरोटच्या सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम १२५,००० रूपयांहून १२४,६५० रुपये इतकी झाली आहे. तर सराफा बाजार उघडताच १८ कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा ₹१०२,०२० इतकी झाली आहे.

तज्ञांच्या मते, सध्याच्या परिस्थितीमध्ये चांदीची नवीन खरेदी टाळावे. कारण कधीही नफा कमी होऊ शकतो. दुसरीकडे, सोने अजूनही एक संतुलित आणि सुरक्षित गुंतवणूक पर्याय मानले जाते. बाजारातील अनिश्चितता वाढत असताना सोन्याची मागणी मजबूत राहू शकते. भविष्यात सोन्याच्या किंमतीमध्ये वाढ होऊ शकते.
जळगावातील सोने चांदीचा दर?
दरम्यान, जळगावच्या सुवर्णबाजारात गेल्या दोन दिवसात चांदी दरात ४००० रुपयांची वाढ दिसून आली. तर सोने १००० रुपयांनी वधारले आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला १ जानेवारी रोजी चांदीच्या भावात एक हजार ५०० रुपयांची वाढ होऊन ती दोन लाख ३५ हजार ५०० रुपयांवर पोहचली. २ जानेवारी रोजीदेखील भाववाढ कायम राहत दोन हजार ५०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे चांदी दोन लाख ३८ हजार रुपये प्रति किलोवर पोहचली.सोन्याच्या भावात १ जानेवारी रोजी १०० रुपयांची तर २ रोजी ९०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे सोने एक लाख ३४ हजार ७०० रुपये प्रति












