लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 की 4500 रुपये जमा होणार? महत्वाची अपडेट समोर

डिसेंबर 25, 2025 10:48 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ डिसेंबर २०२५ । राज्य सरकारची महत्वकांक्षी असलेली लाडकी बहीण योजनेद्वारे पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जात आहे. ऑक्टोबर २०२५ महिन्याचे हप्त्याचे १५०० रुपये नोव्हेंबर महिन्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आले होते. मात्र नोव्हेंबर महिना संपून डिसेंबरदेखील संपत आला आहे. तरी तरीही अजून लाडक्या बहि‍णींना पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

ladki bahin

त्यात महिलांना नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता एकत्र येणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, आता त्यात जानेवारीचा हप्तादेखील मिळणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.जर हप्ता पुढच्या महिन्यात दिला तर महिलांना ३ महिन्याचे हप्ते एकत्र दिले जाऊ शकतात. महिलांच्या खात्यात ४५०० रुपये जमा केले जातील. दरम्यान, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, लवकरच घोषणा केली जाईल.

लाडकी बहीण योजनेत १४ जानेवारीपूर्वी महिलांच्या खात्यात जप्ता जमा केला जाईल, असं सांगण्यात येत आहे. महिलांच्या खात्यात १४ जानेवारी मकरसंक्रांतीच्या दिवशी पैसे जमा केले जातील. दरम्यान ३००० की ४५०० रुपये जमा केले जातील, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, महिलांना दोन महिन्याचे ३००० रुपये दिले जाणार आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now